5 August 2020 3:25 PM
अँप डाउनलोड

सावधान! नाहीतर कोकणी माणूस कुणाचंही ऐकत नाही: शरद पवार

कोंकण : सिंधुदुर्गात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या आधुनिक आणि भव्य हॉस्पिटलचे उद्धाटन राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नाणार प्रकल्पाला होणाऱ्या विरोधावरून मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष पणे सूचक इशारा दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नाणार रिफायनरीला कोकणवासियांकडून होणाऱ्या विरोधाचा धागा पकडून शरद पवार म्हणाले की, तसा कोकणचा माणूस प्रेमळ व सरळ माणूस आहे. परंतु एखादी गोष्ट जर त्याला पटली नाही, तर तो कुणाचंही आजिबात ऐकत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा दिला आणि उपस्थितांना हसू आवारात आलं नाही.

कोकणात अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अशा लाईफटाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालयाचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे गावात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित उद्घाटन करण्यात आले. हे अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाच लाईफटाईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय तब्बल ८२ एकर परिसरात पसरले आहे. ज्या कोकणच्या जनतेने मला मोठे केले त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरिता या हॉस्पिटलचा हा भव्य दिव्य प्रकल्प उभारल्याचे नारायण राणे यांनी आवर्जून सांगितले.

पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नारायण राणे हे एक व्हिजन असलेले नेते आहेत. त्यामुळेच देशातील मोठ्या शहरामध्ये ज्या सुविधा उपलब्ध होत नाहीत अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नारायण राणेंनी ग्रामीण भागातील आपल्या जनतेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत असं सांगत राणेंची स्थिती केली.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x