21 November 2019 3:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कणकवलीतून नितेश राणे विजयी; सेनेचे सतीश सावंत यांचा पराभव

Shivsena, BJP, Nilesh Rane

कणकवली: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. युतीची सत्ता येणार हे स्पष्ट झालं असलं तरी महाआघाडीने देखील चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १६५ च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ९५ जागांच्या वर आलेली आहे. कोकणात झालेल्या शिवसेना व राणे कुटुंबीयांतील लढतीत कोण बाजी मारणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. नितेश राणे यांना भाजपाकडून कणकणवलीमधून उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाचा हा विश्वास सार्थ ठरवत नितेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सतीश सावंत यांचा पराभव केला.

महाराष्ट्रात युती होऊनही शिवसेनेने कणकवलीत स्वत:चा वेगळा उमेदवार उभा केला होता, पण त्यांचा उमेदवार विजयी होऊ शकला नाही. कधीकाळी नारायण राणे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सतीश सावंत यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला होता. पण युतीच्या जागावाटपांमध्ये कणकवलीचा जागा भाजपाककडे गेली. त्यामुळे काही नाराज शिवसैनिकांनी सेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारीचा हट्ट धरला. मात्र सेनेचा हा मनसुबा यशस्वी ठरू शकला नाही.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(24)#Shivsena(753)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या