21 November 2019 2:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

सातारा: पवार नीतीसमोर यापुढे कॉलर खाली; यापूर्वीची मतं सुद्धा राष्ट्रवादीची असल्याचं सिद्ध

NCP, Satara, Udayanraje Bhosale

सातारा: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी सारी तयारी पूर्ण झाली असून, सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुती की आघाडीची सत्ता येणार हे काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. निकालाचा पहिला कल महायुतीच्या बाजूने लागला आहे. जवळपास १६५ च्या वर महायुतीने आघाडी घेतली आहे तर महाआघाडी ९० जागांच्या वर आलेली आहे.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले यांच्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. राज्यातली विधानसभा निवडणूक एका बाजूला आणि साताऱ्याची पोटनिवडणूक दुसऱ्या बाजूला अशी थेट तुलना केली जात होती. मात्र, या प्रचंड हाईप करण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंना पराभवाचा सामना करावा लागणार आहे. ११व्या फेरीनंतर साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले तब्बल ८१ हजार मतांनी पिछाडीवर पडले आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघ आणि तिथल्या मतदारांचा कौल पाहाता उरलेल्या फेऱ्यांमध्ये उदयनराजे भोसलेंना हा फरक भरून काढणं अशक्यप्राय दिसत असल्यामुळे त्यांचा पराभव आता निश्चित मानला जात आहे.

हॅशटॅग्स

#NCP(226)#Udayanraje Bhosale(25)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या