20 April 2024 4:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर चार्टनुसार 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या सर्वच्या सर्व जागा भाजपच जिंकणार - चंद्रकांत पाटील

Graduate teachers, Election voting, cast their votes

पुणे, १ डिसेंबर: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज, मंगळवारी मतदान होणार असून, मतदार यादीतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढविण्याचे आव्हान असणार आहे. कोरोना संकटाच्या सावटाखाली पार पडणाऱ्या या निवडणुकीत कोरोनाबाधित रुग्णांसाठी सायंकाळी ४ ते ५ ही वेळ ठेवण्यात आली असून, इस्पितळांमध्ये दाखल असलेल्या मतदारांना मतदार केंद्रावर आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या सर्वांच्या सर्व जागांवर आम्हीच विजयी होणार असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. या सर्व जागांवर जोरदार चुरस आहे, मात्र भारतीय जनता पक्षाला विजयाची पूर्ण खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नव्हे तर पुण्याची जागा तर एकतर्फी असल्याचं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुणे पदवीधर मतदारसंघात आपण २ वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना लगावला आहे.

 

New English Summary: Voting is going on for 3 graduate, 2 teacher constituencies and Dhule-Nandurbar Legislative Council seats in the state. BJP state president Chandrakant Patil has claimed that we will win all these seats. Chandrakant Patil is confident that the BJP is confident of victory in all these seats. Chandrakant Patil also said that Pune’s place is one-sided

News English Title: Graduate teachers voters will cast their votes today news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x