शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक | जळगाव महापालिकेत भाजपचा पराभव आणि सेनेचा महापौर - वरुण सरदेसाई
जळगाव, १८ मार्च: जळगाव महापालिकेमध्ये सांगली पॅटर्न राबवत अखेर शिवसेनेनं भाजपला सत्तेवरून खाली खेचत भगवा फडकावला आहे. शिवसेनेच्या महापौरपदाच्या आणि उपमहापौरपदाच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. सेनेनं तब्बल 45 मतं मिळवली आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकला आहे. थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे.
जळगाव महापालिका महापौरपदाच्य निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार जयश्री सुनील महाजन आणि कुलभूषण पाटील या दोन्ही मतदारांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांचा विजय निश्चित झालेला आहे. त्यांनी बहुमताचा ३८ हा आकडा पार केला आहे. त्यामुळे ते जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने 45 तर भाजपला 30 मते मिळाली आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.
महत्वाचे म्हणजे, जळगावमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत ५७ पैकी तब्बल ३० नगरसेवक सेनेत दाखल झाले होते. महापौरपदाच्या निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने भाजपने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. परंतु,औरंगाबाद खंडपीठाने भाजपची याचिका फेटाळून लावली. कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक ऑनलाइन घेण्यासाठी कोर्टाने आदेश दिले होते. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. त्यानंतर युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विटरवर माहिती देताना म्हटलं आहे की, “शिवसेनेचा surgical strike!….जळगाव महापालिकेत भाजपचा पराभव करत शिवसेनेच्या महापौर विराजमान !….सांगली नंतर जळगाव मधील भाजपची एक हाती सत्ता गेली ! ….महाविकास आघाडीचा विजय असो !
शिवसेनेचा surgical strike!
जळगाव महापालिकेत भाजपचा पराभव करत शिवसेनेच्या महापौर विराजमान !
सांगली नंतर जळगाव मधील भाजपची एक हाती सत्ता गेली !
महाविकास आघाडीचा विजय असो !
— Varun Sardesai (@SardesaiVarun) March 18, 2021
News English Summary: Shiv Sena’s surgical strike! Shiv Sena’s mayor victory over defeating BJP in Jalgaon Municipal Corporation! it is victory of Mahavikas Aghadi said Yuavsena secretary Varun Sardesai.
News English Title: Yuvasena secretary Varun Sardesai tweet after Jalgaon Municipal corporation mayor election victory news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News