17 May 2021 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर प. बंगाल | सीबीआय'च्या TMC नेत्यांवर धाडी, ममता बॅनर्जी थेट CBI कार्यालयात प. बंगालच्या राज्यपालांकडून खटला दाखल करण्याची परवानगी घेत TMC नेत्यांवर सीबीआयच्या धाडी गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवे कोरोना रुग्ण | ४,१०६ रुग्णांचा मृत्यू
x

शिवप्रतिष्ठानमध्ये फुट | संभाजी भिडे गूरूजींच्या निकटवर्तीयाने केली नव्या संघटनेची स्थापना

Nitin Chowgule, Shri Shiv Pratishthan Yuva Hindusthan, Sambhaji Bhide Guruji

सांगली, २२ फेब्रुवारी: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांचे विश्वासू नितीन चौगूले यांची काही दिवसांपुर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. वर्षभरापासून त्यांच्या विरोधात तक्रारी येत असल्याने स्वत: भिडे गुरूजींनी कारवाई केली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्या नव्या संघटनेचे नाव ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थान’ असं आहे. सामाजिक कार्य करून संपुर्ण राज्यभर संघटनेचा विस्तार करणार असल्याचं नितीन चौगुले यांनी यावेळी सांगितले.

नितीन चौगुले म्हणाले, “शिवप्रतिष्ठानमधून माझं निलंबन करण्यात आले. यावर कोणतेचं कारण संघटनेकडून देण्यात आलं नाही म्हणून मी शिवप्रतिष्ठानमधील नाराज धारकऱ्यांना घेऊन नव्या संघटनेची स्थापना केली आहे. गुरूजींचे विचार देशासमोर मांडण्यासाठी नव्या संघटनेची स्थापना केली आहे”. तसेच ते पुढे म्हणाले की, गुरूजींच्या शिवप्रतिष्ठानमध्ये असे काही लोक आहेत की जे चुकीची कामं करतात. या लोकांनीच भिडे गुरूजींना माझ्याबद्दल खोट सांगत माझे निलंबन करायला लावले आहे.

संघटनेतून कोणतेही कारण न देता निलंबन करणाऱ्यांमध्ये मी एकटाच नाही. असे अनेकजण आहेत की ज्यांना संघटनेतून निलंबित केले आहे. त्यामुळे मी शिवभक्तांना आणि महाराष्ट्रातील धारकऱ्यांना सोबत घेऊन नव्या संघटनेची स्थापना केली आहे”. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरूजी वादात सापडले होते. तेव्हापासून त्यांच्या संघटनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत होता.

पाच सात वर्षापूर्वी शिवप्रतिष्ठानपासून दूर झालेले अचानक स्वत:च्या फायद्यासाठी पुन्हा सक्रीय झाले, त्यावेळी भिडे यांना त्यांच्या हेतूबद्दल कल्पना दिली होती, याच चौकडींनी आपली बदनामी केली असली तरी यापुढेही शिवप्रतिष्ठानचे उपक्रम तितक्याच ताकदीने राबवले जातील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही राजकारणविरहित संघटना असेल, संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या क्षेत्रात संघटना काम करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

 

News English Summary: Nitin Chowgule, a confidant of Sambhaji Bhide Guruji, the national president of Shiv Pratishthan Hindustan, was expelled a few days back. Bhide Guruji himself had taken action as complaints had been coming against him for over a year. Nitin Chowgule has formed a new organization by holding a rally in Sangli. The name of his new organization is ‘Shri Shiv Pratishthan Yuva Hindusthan’. Nitin Chowgule said that he will expand the organization throughout the state by doing social work.

News English Title: Nitin Chowgule form a Shri Shiv Pratishthan Yuva Hindusthan news updates.

हॅशटॅग्स

#Sambhaji Bhide(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x