24 September 2023 5:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vivo T2 Pro 5G | विवो T2 प्रो 5G स्मार्टफोनची इतकी क्रेझ का आहे? बजेट किंमतीत दमदार फीचर्स आणि स्पेफिकेशन्स Numerology Horoscope | 24 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Stocks to Buy | गुंतवणूकीसाठी ही टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 39 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले टॉप 3 शेअर्स, अल्पावधीत 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, लिस्ट सेव्ह करा Mufin Green Share Price | श्रीमंत करतोय शेअर! मागील 5 वर्षांत शेअरने 2077% परतावा दिला, काल 20% परतावा दिला, किंमत 68 रुपये Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 24 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तुफान तेजीत येणार, कंपनीला एका मागून एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा सपाटा, फायदा घेणार?
x

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक प्रचार | भाजपचे प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्ह

BJP MLA Ranjitsingh Mohite Patil, Pandharpur Mangalvedha, Bhagirath Bhalke

पंढरपूर, ७ एप्रिल: राष्ट्रवादीचे नेते भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीने भारतनाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भारत भालके विरुद्ध समाधान आवताडे यांच्यात लढत होत आहे.

मात्र आता भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यालाच कोरोनाची बाधा झाली आहे. भाजप नेते आणि विधानपरिषदेचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत असताना रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यांनंतर त्यांची चाचणी केली असता, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

निवडणुकीच्या प्रमुख शिलेदारालाच विलगीकरणात जावे लागल्याने भारतीय जनता पक्षाला आणखी एक धक्का मानला जात आहे. दरम्यान संपर्कात आलेल्यांनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे

 

News English Summary: BJP leader and MLA Ranjit Singh Mohite Patil has contracted corona. While walking in the constituency for the campaign of Bharatiya Janata Party candidate Samadhan Avtade, Ranjit Singh Mohite Patil had found symptoms of corona. After testing them, the report came back positive.

News English Title: BJP MLA Ranjitsingh Mohite Patil got corona positive during Pandharpur Mangalvedha by poll election news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x