29 March 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला
x

राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला? पवारांच्या त्या टीकेमुळे १० रुपयात थाळी बोंबलणार?

Shivsena, ncp president sharad pawar, Chief Uddhav Thackeray

सोलापूर: राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या १० रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी टोला लगावला होता. त्यावेळी एका सभेतील प्रचारात तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवाल शरद पवारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. विधानसभा निवडणुकीच्या बार्शी येथील प्रचारसभेत पवारांनी शिवसेनेच्या त्या घोषणेवर टीका केलो होती.

यावेळी पवारांनी जाहीरनाम्यातील विषयांवरून शिवसेना-भारतीय जनता पक्षावर टीकेची झोड उठवली होती. विशेषत: त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दहा रुपयांमध्ये सकस थाळी देण्याच्या घोषणेचा समाचार घेतला होता. यापूर्वी शिवसेनेकडून राज्यात एक रुपयात झुणका भाकर अशी योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, पुढे त्याच काय झालं? झुणका भाकर केंद्रे बंद पडली आहेत. या केंद्रांची जागा हडपण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असा खोचक सवालही त्यांनी विचारला होता.

उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवरील आपल्या घोषणेप्रमाणे शिवसेनेच्या वचननाम्यात १० रुपयात सकस जेवणाची थाळी देण्याच आश्वासन दिलं होतं. शरद पवार यांनी बार्शी येथील उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभा घेतली होती आणि त्या सभेत बोलताना, शिवसेनेच्या १० रुपयात थाळी देण्याच्या योजनेचा समाचार घेतला. यापूर्वी शिवसेनेकडून १ रुपयात झुणका भाकर सुरू करण्यात आली होती. काय झालं त्याचं? झुणका भाकर केंद्र बंद पडली. मात्र, तेथील जागा हडपण्यात आल्या आहेत. त्या जागेवर इतर उद्योगधंदे सुरू असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच, आम्ही तुम्हाला राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाक करायला, असे म्हणत १० रुपयातील थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला. दरम्यान, यापूर्वी अजित पवार यांनीही १० रुपयांच्या थाळीवरुन शिवसेनेला टोला लगावला होता.

मात्र उद्धव ठाकरेंना जाहीरनाम्यात वचन देताना आणि शरद पवारांना याच विषयावरून उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताना याची अजिबात कल्पना नव्हती की निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची आघाडी शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सरकार स्थापन करून सत्तेत बसेल. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही १० रुपयात सकस आहार योजनेवरून कात्रीत सापडल्याचं दिसतं आहे.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x