26 July 2021 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Special Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी
x

केंद्राकडे MTNL-BSNL वाचवायला पैसे नाही; बिर्ला म्हणाले मदत करा अन्यथा व्होडाफोनला टाळं

Vodafone Idea, Kumar mangalam Birla

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर व्होडाफोन आयडीयाला ५३ हजार कोटींचे शुल्क सरकारकडे भरावे लागणार आहे, मात्र यामध्ये केंद्र सरकारने कंपनीला दिलासा दिला नाही तर मात्र कंपनीला नाईलाजास्तव व्यवसाय गुंडाळावा लागेल, असा ईशाराच आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष आणि व्होडाफोन आयडियाचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला यांनी दिला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

दरम्यान, बिर्ला यांच्या विधानाचे पडसाद शेअर बाजारात उमटले. शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या इशाऱ्याने वोडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांचे टेन्शन वाढले आहे. टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओच्या मोफत खैरातींमुळे अनेक कंपन्यांचे ग्रह फिरल्याचे चित्र आहे. जिओच्या ऑफर्समुळे आयडिया, व्होडाफोन, भारती एअरटेल या कंपन्यांना आपल्या सेवांचे दर नाईलाजाने खाली आणावे लागले होते. साहजिकच या कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून त्यांच्या उत्त्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे.

तत्पूर्वी २०१५ मध्ये आयडिया सेल्युलरचा निव्वळ नफ्याचा आकडा २,६१६ कोटी इतका होता. मात्र, रिलायन्स जिओच्या प्रवेशामुळे गेल्या आर्थिक वर्षात आयडिया सेल्युलरला २०१७ मध्ये तब्बल ८३१.१० कोटींचा तोटा सहन करावा लागला होता. याशिवाय, कंपनीचे महसुली उत्त्पन्नही दीड टक्क्यांनी घसरले होते. त्यामुळेच कंपनीवर थेट कुमार मंगलम बिर्ला यांच्या मानधनात देखील कपात करण्याची वेळ ओढवली होती.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1609)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x