26 April 2024 1:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

भाजप कार्यकर्तीवर अत्याचार | राज्य सुरक्षित नाही बोलणाऱ्या भाजपच्या पक्ष कार्यालयात महिलेला मारहाण, शिव्या आणि धक्काबुक्की

Rupali Chakankar

पुणे, २३ सप्टेंबर | राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या अनेक घटना वाढत आहेत. त्यात नुकताच मुंबईत साकीनाका परिसरात बलात्काराची घटनाही उघडकीस आली आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना.

भाजप कार्यकर्तीवर अत्याचार | राज्य सुरक्षित नाही बोलणाऱ्या भाजपच्या पक्ष कार्यालयात महिलेला मारहाण, शिव्या आणि शिव्या – NCP leader Rupali Chakankar slams BJP party after incident happened in Mumbai BJP office against BJP women worker :

दुसरीकडे मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याने भाजप पक्ष अडचणीत येण्याची शक्यता आहे. तसेच सत्ताधाऱ्यांना मोठी संधी मिळाल्याने भाजपच्या नेत्यांची तोंडं बंद होतील असा संतापजनक प्रकार थेट मुंबई भाजपच्या कार्यालयात घडला आहे. मुंबईच्या बोरीवलीत भाजप पदाधिकाऱ्यांने त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कार्यालयात एका महिलेला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

म्हणून पोलिसांत केली तक्रार:
पक्षात पद देतो, असे सांगून स्थानिक भाजपा पदाधिकारी प्रतीक साळवी याने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेल्या तक्रारीवरून बोरीवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रारही केली होती. मात्र, याची दखल न घेतल्याने तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

या संतापजनक प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भारतीय जनता पक्षाला खडेबोल सुनावले आहेत. यासंदर्भात ट्विट करताना रुपाली चाकणकर यांनी भाजपाला चांगलंच धारेवर धरलं आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटलंय की, “महाराष्ट्र सुरक्षित नाही बोलणाऱ्या भाजपच्या नेत्यांना भाजपा पक्ष कार्यालयात महिलेने न्यायाची, मदतीची मागणी केल्यावर मदत सोडा! धक्का, बुक्की, शिव्या मिळाल्या तक्रारकर्त्या महिलेला मारहाण करण्यात आली. आज बोरीवली पो. ठाण्यात भाजपा नगरसेविका कार्यालयात भाजपा कार्यकर्त्याने”.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: NCP leader Rupali Chakankar slams BJP party after incident happened in Mumbai BJP office against BJP women worker.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x