20 June 2021 3:35 PM
अँप डाउनलोड

हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करतोय, मी विरोधी पक्षाप्रमाणे नव्हे जबाबदारीने बोलणार - मुख्यमंत्री

Tauktae cyclone

रत्नागिरी, २१ मे | तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज (२१ मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात दाखल झाले आहेत. यावेळी ठाकरे यांनी पंचनामे पूर्ण होताच मदतीसंदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही सांगत विरोधकांना टोला लगावला. तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी तेथील उपस्थितांशी संवाद साधत कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जास्त फिरत बसण्यापेक्षा जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत असं सांगितलं आहे.

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले.

मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना, “मी येथील विरोधी पक्ष बोलतो तसा बोलणार नाही. मी जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.

 

News English Summary: Speaking on the aid announced by Modi to Gujarat, he said, “I will not speak like the Opposition here. I will speak responsibly. Even if the Prime Minister does not come to us, he will not stay without proper help to Maharashtra, ”said Uddhav Thackeray.

News English Title: CM Uddhav Thackeray on Konkan tour after damage of tauktae cyclone news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(386)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x