5 August 2021 3:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा उत्तर प्रदेश निवडणुक २०२२ | प्रियांका गांधी यांच्यासंबंधित 'तो' जुना सल्ला काँग्रेस आता गांभीर्याने घेणार?
x

जळगाव | शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय | आमदारकीसाठी मोर्चेबांधणी?

Shivsena corporator Nitin Laddha

जळगाव, १८ जुलै | शहरातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय जळगाव शहरातील मध्यवर्ती भागात तयार करण्यात आले असून आषाढी एकादशीचे औचित्य साधत कार्यालयाचे भव्य उद्घाटन केले जाणार आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक असलेल्या मणियार बंधुनी लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शहरात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून अनेकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. जळगाव शहरात सध्या माजी मंत्री गिरीश महाजन, विद्यमान आमदार सुरेश भोळे यांचे संपर्क कार्यालय असून इतर लोकप्रतिनिधी मात्र कुठे फिरकत नसल्याचे दिसून येते. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकी लढविण्याचे स्वप्न अनेक जण पाहत असले तरी अद्यापही कुणीही खुलेपणाने मैदानात उतरले नाही. शिवसेनेकडून सध्या काही नावे पुढे येत असली तरी त्यात युती आणि आघाडीच्या भविष्यातील निर्णयावर सर्वांचेच भवितव्य अवलंबून आहे.

जळगाव शहरातील मध्यवर्ती परिसर असलेल्या गोविंदा रिक्षा स्टॉप जवळ शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांचे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. संपर्क कार्यालयाचे अद्याप अधिकृतपणे उद्घाटन झाले नसले तरी आषाढी एकादशीचे औचित्य साधत सर्व नगरसेवक, आमदारांच्या उपस्थितीत उद्घाटन केले जाणार असल्याचे माहिती आहे. २०२४ ची विधानसभा निवडणुका लक्षात घेता या कार्यालयाचे उद्घाटन हे पुढील राजकीय सूतोवाच असल्याचे बोलले जात आहे.

नगरसेवक नितीन लढ्ढा यांची काही दिवसांपूर्वी जळगाव लाईव्हने मुलाखत घेतली असता आमदारकी लढविण्याबाबत उत्तर देताना त्यांनी अतिशय समर्पकपणे मत मांडत जनतेची आणि शहराची सेवा करणे हाच उद्देश असल्याचे सांगितले होते. त्यातही पद कोणतेही असो फक्त सेवा हाच आपला धर्म असल्याचे त्यांनी मांडले होते.

नितीन लढ्ढा शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू निकटवर्ती आहेत. सुरेशदादा जैन यांच्यानंतर त्यांचा पुढील राजकीय वारसदार म्हणून नितीन लढ्ढा यांच्याकडे पाहिले जाते. शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयातून ७, शिवाजीनगरची पुढील सर्व सूत्रे हलतील असा अंदाज राजकीय विश्लेषक बांधत आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena senior corporator Nitin Laddha public communication Centre in Jalgaon news updates.

हॅशटॅग्स

#Shivsena(1125)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x