25 March 2023 10:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

'वडे-चिकन सूप' टीकेची आठवण? | ज्यांनी आजोबांचं जेवण काढलं त्यांच्यावर मी बोलणार नाही, ते माझे संस्कार नाही - आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray | वेदांता-फॉक्सकॉनच्या मुद्द्यांवरुन राज्यात पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मंगळवारी आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर घालविल्याचा आरोप करत जोरदार हल्लाबोल केला.

माहितीच्या अधिकारात अर्ज
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प आता गुजरातमध्ये गेला. प्रकल्प गुजरातमध्ये गेला त्याचं वाईट वाटत नाही. मात्र त्यामुळे महाराष्ट्रातील लाखो युवकांचा लोकांचा रोजगार गेला, आणि त्याबद्दल कोणीच बोलत नाही. हा प्रकल्प आमच्यामुळे गेला असा आरोप झाला. महाविकास आघाडीच्या काळात यावर काहीच कार्यवाही झाली नाही, असा आरोप झाला. यावर आम्ही माहितीच्या अधिकारात अर्ज केला होता. त्याला आता दीड महिन्यांनी उत्तर आलं आहे.

वेदांताच्या प्रमुखांना पत्राद्वारे निमंत्रण
5 सप्टेंबर 2022 रोजी एमआयडीसीच्या वतीने वेदांताचे प्रमुख अनिल अग्रवाल यांना सामंजस्य करार सही करण्यासाठी एका पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आलं होतं. मी यापूर्वीही हा पत्रव्यवहार झाल्याचं सांगतं होतो. पण तेव्हा ते पत्र आमच्या हातात नव्हतं. खोके सरकारमध्ये बसलेल्या आमच्याच लोकांनी मला याबाबत माहिती दिली होती.

या पत्रानुसार एमआयडीसीने वेदांताला वीज, पाणी आणि जमिनीसह दिलेल्या सर्व ऑफर्सची माहिती आहे. जेव्हा सामंजस्य करारासाठी एखाद्या कंपनीला निमंत्रण दिलं जातं तेव्हा प्राथमिक टप्प्यातील सर्व बोलणी झालेली असते. सर्व अटी-शर्ती ठरलेल्या असतात. केवळं कागदोपत्री प्रक्रिया होणे बाकी असते.

Vedanta

राज ठाकरेंसंदर्भात प्रश्न :
यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरेंना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या आजारावरून नक्कल करत खिल्ली उडवण्यावर प्रश्न विचारला. त्यावर आदित्य ठाकरेंनी थेट प्रतिउत्तर देणं टाळलं असलं तरी त्यांनी एकवाक्यता जुन्या विषयाला हात घातला. आदित्य ठाकरे म्हणाले, “ज्यांनी आजोबांचं (स्व. बाळासाहेब ठाकरे) जेवण काढलं त्यांच्यावर मी बोलणार नाही, ते माझे संस्कार नाही अशी टिपणी केली.

आदित्य ठाकरे असं का म्हणाले?
आपल्या संस्कृतीनुसार, देवाघरी गेलेल्या व्यक्तीसाठी आपण काय काय केलं, याचं कुणी भांडवल करत नाही. २०१४ मध्ये बाळासाहेब गेल्यानंतरची ती पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा अनपेक्षित परिणाम झाला. परिणामी, लोकसभेच्या निवडणुकीत मनसेला दणदणीत हार पत्करावी लागली आणि त्यानंतर मनसेची अधोगती सुरु झाली ती आजपर्यंत थांबलेली नाही. राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष करण्याच्या नादात बाळासाहेब ठाकरेंना खाण्यासाठी घेऊन गेलेल्या ‘वडे-सूपची’ आठवण करून देत त्यांच्यावर कसं दुर्लक्ष होतं हे दाखविण्याचा भर सभेतून प्रयत्न केला होता. पण, इतक्या छोट्या गोष्टींसाठी मातोश्री असं करेल कोणालाही पटलं नाही आणि राज ठाकरेंवर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड टीका झाली होती. सध्या राज ठाकरे तीच चूक पुन्हा करत आहेत असं चित्र निर्माण होतंय. त्यामुळे त्याच जुन्या मुद्द्याला थोडक्यात उत्तर देऊन आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना पुन्हा कोंडीत पकडलं आहे अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण यावर लगेच कोल्हापूरमध्ये प्रश्न विचारण्यात आले आणि राज ठाकरे सारवासारव करताना दिसले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Yuva Sena Leader Aaditya Thackeray slams MNS Chief Thackeray over targeting on Uddhav Thackeray check details on 30 November 2022.

हॅशटॅग्स

#Aaditya Thackeray(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x