13 July 2020 6:47 AM
अँप डाउनलोड

पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांवर आधी कारवाई करा: जयसिंह मोहिते पाटील

Minister Ajit Pawar, Jaysingh Mohite Patil, Solhapur

सोलापूर: जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या ६ सदस्यांवर कारवाई केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे. ‘रात्रीच्या अंधारात भारतीय जनता पक्षासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावरही राष्ट्रवादीने कारवाई करावी,’ असं खुलं आव्हान मोहिते पाटलांनी दिलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

“पक्षाच्या विरोधी भूमिका घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवारांवर कोणती कारवाई केली. अडीच वर्षांपूर्वी संजय शिंदे भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष ज्यांनी दगाबाजी केली, त्यांच्यावर कोणती कारवाई केली. दिपक साळुंखे यांचा विधान परिषद निवडणुकीत कोणी मतदान केलं नाही, राष्ट्रवादीच्या सदस्यांवर कोणती कारवाई केली,” असे अनेक प्रश्नही जयसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केले आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाच्या ६ सदस्यानी भारतीय जनता पक्षाला मतदान केल्यानंतर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांनी ही कारवाई केली.

स्वरुपाराणी मोहिते पाटील, शितल देवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, सुनंदा फुले, गणेश पाटील, मंगल वाघमोडे या ६ सदस्यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे सर्व सदस्य माळशिरस तालुक्यातून असून मोहिते-पाटील गटातील आहेत. विशेष म्हणजे निलंबन झालेल्या सहा सदस्यांपैकी दोन सदस्य हे मोहिते-पाटील यांच्या कुटुंबातील आहेत.

 

Web Title:  Solapur ZP Election 2020 take action on Minister Ajit Pawar first says Jaysingh Mohite Patil.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(111)#NCP(296)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x