12 October 2024 3:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Login | पगारदारांनो, तुम्ही गरजेच्या वेळी EPF मधून पैसे काढता, नवा नियम लक्षात घ्या, होतं खूप मोठं नुकसान - Marathi News Post Office Scheme | महिलांनो पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवा आणि 32,000 रुपयांपर्यंत व्याज मिळवा, जाणून घ्या योजनेविषयी Post Office Interest Rate | पोस्ट ऑफीसची खास योजना, बचतीवर व्याजानेच कमवाल 2 लाख रुपये, फायदाच फायदा - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्ड घेण्याआधी स्वतःला विचारा हे प्रश्न, नुकसान होणार नाही आणि मिळतील अनेक फायदे - Marathi News EPFO Passbook | पगारातून EPF चे पैसे कापले जातात, असा घ्या फायदा, EPF खात्यात जमा होतील 3 ते 5 करोड - Marathi News Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तन, या 6 राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरु होतोय, तुमची राशी कोणती - Marathi News Gold Rate Today | बापरे, दसऱ्याच्या एक दिवस आधी सोन्याचे भाव वाढले, तुमच्या शहरातील आजचे नवे दर जाणून घ्या - Marathi News
x

पंकजा मुंडे यांनी १०६ कोंटींचा मोबाईल घोटाळा केला: धनंजय मुंडे

Dhananjay Munde, Pankaj Munde

बीड : ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांच्या केंद्रांना पुरविण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे चिक्की घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा पंकजा यांच्यावर घोटाळ्याचे गंभीर आरोप लागले आहेत.

पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर, आता मोबाईल खरेदी प्रकरणातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप, त्यांचे चुलतभाऊ आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे ही बाब गंभीर असल्याचं दिसत आहे. पंकजा मुंडेंच्या अधिपत्याखाली असलेल्या महिला व बाल कल्याण विभागाने राज्याच्या तीस जिल्ह्यातील ८५,४५२ अंगणवाडी केंद्रासाठी जवळपास लाखभर मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंकजा यांच्या विभागाने बंगळुरू स्थित एमएस सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि.या कंपनीकडून पॅनासोनिक इलुगा १७ हा मोबाईल खरेदी करण्याचा निर्णय घेतला. संगणक माहिती सक्षम रीयल-टाईम मॉनिटरींग (ITC – RTM) योजनेसाठी हा स्मार्टफोन्स खरेदी करण्यात येत आहेत. याबाबतचा सरकारी अध्यादेश (GR) २८ फेब्रुवारी २०१९ रोजी काढण्यात आला असून, त्यात हे मोबाईल सिम कार्ड आणि डेटा प्लॅनसह अंगणवाडी सेविकांना वितरित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

पॅनासोनिक इलुगा १७ हा स्मार्टफोन मोबाईल खरेदी करताना प्रत्येक मोबाईल मागे कंपनीला सुमारे २२०० रूपये जास्तीची रक्कम देण्यात आल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. पॅनासोनिक इलुगा सतरा या मोबाईल फोनची बाजारपेठेतील किंमत ६,४९९ रूपये इतकी आहे. तर, हा मोबाईल ६००० ते ६४०० रूपयांत उपलब्ध होतो. मात्र, पंकजा यांच्या विभागाने या मोबाईलची खरेदी करताना ८,७७७ रूपये इतकी किंमत मोजली आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलची किंमत सुमारे २२०० रूपये इतकी वाढविण्यात आली आहे. तसेच महिला व बाल कल्याण विभागाने MS सिस्टेक आयटी सोल्युशन प्रा.लि. या कंपनीकडून गरज नसताना आणखी ५,१०० अतिरिक्त मोबाईल खरेदी केले आहेत, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x