16 August 2022 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 ऑगस्ट, बुधवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Balaji Solutions IPO | बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | लॉटरीच लागली! या शेअरच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड सुद्धा Investment Schemes | सर्वात जास्त परतावा आणि टॅक्स बचत करणाऱ्या सरकारी योजना कोणत्या?, नफ्याच्या योजनांची माहिती जाणून घ्या PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Horoscope Today | 17 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
x

अदाणी झाले! आता अनिल अंबानींना गुजरातमधील ६४८ कोटीच्या विमानतळाच्या कंत्राटाची लॉटरी

Narendra Modi, Anil Ambani, Rahul Gandhi

नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमानांच्या प्रकरणावरुन आधीच गर्तेत अडकलेले उद्योजक अनिल अंबानी यांच्या कंपनीला गुजरातमधील विमानतळांचे कंत्राट देण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने आर इन्फ्रा म्हणजे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला तब्बल ६४८ कोटी रुपयांचे काम देण्यात आले आहे. याबाबत कंपनीकडूनच माहिती देण्यात आली आहे. आर इन्फ्राने सर्वात कमी बोली लावून हे कंत्राट मिळवले आहे. अनिल अंबानींचं राफेल करारानंतरचं हेआणखी एक यशस्वी उड्डाण ठरलं आहे.

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. हे विमानतळ अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्ग ८ ब येथून जाणाऱ्या मार्गावर बांधण्यात येत आहे. राजकोट विमानतळापासून हे विमानतळ केवळ ३६ किलोमीटर अंतरावर आहे. या विमानतळाच्या कंत्राटासाठी लार्सन अँड टुर्बो, दिलीप बिल्डकॉन, गायत्री प्रोजेक्स यांसह ९ कंपन्यांनी टेंडर भरले होते. परंतु, सर्वात कमी बोली लावल्याने अंबानींच्या रिलायन्स कंपनीला हे कंत्राट देण्यात आले आहे.

भारतीय विमान प्राधिकरणासोबत झालेल्या या करारात रनवे निर्मिती, टर्निंग पॅड, टॅक्सी लाईन, रस्ते, अग्निशामक स्थानिक, कुलिंग पिट, एअर फिल्ड ग्राऊंड लायटिंग योजनेचे परीक्षणसह नेव्हिगेशन आणि पक्षांमुळे होणारी अडचण कमी करण्यासाठीचा उपाय आदी कामांचा समावेश असल्याचे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, काम करण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर ३० महिन्यात म्हणजेच अडिच वर्षात हे काम पूर्ण करणे कंपनीला बंधनकारक आहे, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने एक परिपत्रक काढून याबाबत माहिती दिली.

दरम्यान, यापूर्वी देशातील पाच विमानतळांची जबाबदारी अदानी समूहाला देण्यात आली आहे. अदानी समूहानं ६ विमानतळांसाठी बोली लावली होती. त्यापैकी ५ बोलींमध्ये त्यांना यश आलं. तर एका विमानतळाचा निर्णय शिल्लक राहिला होता. अदानी समूहानं विमान उड्डाण क्षेत्रात दमदार प्रवेश करत ५ विमानतळांचं ५० वर्षांसाठीचं कंत्राट मिळवलं. यामध्ये लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मंगळुरु आणि त्रिवेंद्रमचा समावेश आहे. देशातील ५ मोठ्या विमानतळांच्या देखभाल, दुरुस्ती आणि अत्याधुनिकीकरणाचं कंत्राट पुढील पन्नास वर्षांसाठी अदानी समूहाकडे असणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणानं (AAI) याबद्दलची माहिती दिली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1659)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x