23 September 2021 1:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Municipal Corporation Elections 2022 | मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत संतापजनक | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना फक्त ५० हजार रुपये भरपाई | केंद्राची सुप्रीम कोर्टात माहिती IPL 2021 | DC vs SRH | आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराइज हैदराबाद सामना रंगणार Hybrid Flying Car | केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासमोर फ्लाइंग कारचे मॉडेल सादर राज्यपालांनी राज्याच्या हिताचा आणि ओबीसी समाजाच्या हिताचा निर्णय घेतला - फडणवीस उद्या सोमैय्यांचा पारनेर येथे 'आरोप पर्यटन दौरा' | कारखाना विक्री प्रकरणी सोमय्या पारनेरला जाणार Benefits of Fever | ताप येण्याचे शरीरासाठी असे '४' प्रकारचे फायदे - नक्की वाचा
x

जळगाव | आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवणुकीची सेना-राष्ट्रवादीत खलबतं?

Eknath Khadse

जळगाव, २० ऑगस्ट | जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मागील काही महिन्यांपासून पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यात राज्यातील दिग्गज नेते एकनाथराव खडसे यांच्याशी देखील गुलाबराव पाटलांचे फारसे जमत नाही. दरम्यान, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची मुंबईत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार चिमणराव पाटील यांनी एकत्र भेट घेतली. रुग्णालयातून घरी परतल्यावर खडसेंची ही सदिच्छा भेट असली तरी अनेकांच्या या भेटीने भुवया उंचावल्या आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नशिराबाद निवडणूक संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. (NCP leader Eknath Khadse Shivsena Gulabrao Patil and MLA Chimanrao Patil meet in Mumbai) :

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यामध्ये आजवर अनेकवेळा शाब्दिक कलगीतुरा रंगलेला आहे. सध्या दोन्ही नेते महाआघाडी सरकारमध्ये असल्याने ते एकमेकांवर टीका टिपणी करत नाही. काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांनी टीका करीत घरचा आहेर दिला होता.

माजी मंत्री एकनाथराव खडसे हे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थतेमुळे मुंबई येथे उपचार घेत होते. रुग्णालयातून त्यांची सुट्टी करण्यात आली असून ते मुंबईतच आहेत. बुधवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी एकनाथराव खडसेंची (NCP leader Eknath Khadse) सदिच्छा भेट घेतली. तब्येतीची विचारपूस करून त्यांनी औपचारिक चर्चा केली. दरम्यान आगामी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नशिराबाद निवडणूक संदर्भात यावेळी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही दिवसात जळगावमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार असं म्हटलं जातंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP leader Eknath Khadse Shivsena Gulabrao Patil and MLA Chimanrao Patil meet in Mumbai news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(86)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x