30 April 2024 11:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

शिंदे गटाच्या नेत्यांकडून महिलाविरोधी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका, लोकांमध्ये रोष वाढतोय, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

CM Eknath Shinde

Shinde Camp Meeting | महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. सुप्रिया सुळेंच्या टीकेला उत्तर देत असताना सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी गलिच्छ भाषेत टीका करत असताना सत्तारांच्या टीकेनंतर राज्यभरात संताप व्यक्त होतो आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आता अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान सर्वच स्तरातून सत्तार यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांना फोन करुन त्यांचे कान टोचले. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री शिंदे चांगलेच संतप्त झाल्याचं पाहालया मिळालं. तसंच त्यांनी सत्तार यांना जाहीरपणे माफी मागण्याचेही आदेश दिले आहेत. यासोबतच सर्व प्रवक्त्यांनी संसदीय भाषेची मर्यादा पाळूनच विरोधकांवर टीका करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली
एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांमध्ये आमदार आणि प्रवक्त्यांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. आमदार आणि प्रवक्त्यांनी भविष्यात अशी वक्तव्य करू नयेत, तसंच बोलताना काळजी घ्यावी, असा सज्जड दम या बैठकीत दिला जाण्याची शक्यता आहे. आमदार आणि प्रवक्त्यांनी लगेच कोणत्याही मुद्द्यावर बोलू नये, असे आदेशही एकनाथ शिंदेंकडून आमदार आणि प्रवक्त्यांना दिले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde called meeting of Shinde camp MLAs after controversial statement against women’s check details 07 November 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x