3 May 2024 7:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Credit Card Payment | क्रेडिट कार्डने घर भाडे द्यावे की नाही? मोठं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे समजून घ्या, वाचा डिटेल

Credit Card payment

Credit Card Payment | आजकाल लोक बाजारात कोणत्याही वस्तूंच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. क्रेडिट कार्डचा वापर ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. पूर्वी एक काळ असा होता की क्रेडिट कार्डचा वापर फक्त मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी केला जात होता. आजकाल क्रेडिट कार्डचा वापर करून आपण किराणा खरेदीपासून ते कॅब पेमेंटपर्यंत सर्व प्रकारचे पेमेंट करतो. परंतु प्रश्न असा आहे की, तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून घर भाडे भरू शकता का? घर भाडे भरणे हा आपल्या काही महत्त्वाच्या खर्चांपैकी एक आहे. मात्र भाडे क्रेडिट कार्डचा वापर करून भरणे ही एक वाईट कल्पना असू शकते. याचीही काही कारणे आहेत

क्रेडिट स्कोअर :
घर भाडे भरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करण्याचे सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंट चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोर खराब होऊ शकतो. तथापि, जर तुमची सर्व क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली गेली असतील तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. दुसरीकडे, जर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब झाला तर इतर तुम्हाला कर्ज घेताना अडचण येऊ शकतात.

क्रेडिट युटिलायझेशन रेशो :
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर करून जितके जास्त खरेदी व्यवहार कराल तितका तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढत राहील. घर भाडे हा एक मोठा खर्च आहे. क्रेडिट बिल वेळेवर न भरता दर महिन्याला तुमचे क्रेडिट कार्ड वापरून भाडे भरण्याची सवय तुम्हाला लागली तर तुमच्या क्रेडिट कार्डवर क्रेडिट बॅलन्सची समस्या निर्माण होऊ शकते. दुसरीकडे एवढ्या मोठ्या मासिक खर्चामुळे तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतच जाईल, मात्र जर तुमचे प्रमाण निर्धारित क्रेडिट मर्यादेच्या 30 टक्के पेक्षा जास्त गेले तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो.

व्याजदर :
क्रेडिट कार्डवरील जास्त व्याज आकारला जातो. अर्थात, तुम्हाला व्याजमुक्त परतफेडीचा कालावधी ही दिला जातो, परंतु त्या दिलेल्या कालावधीत पेमेंट करणेही आवश्यक आहे. क्रेडिट कार्ड बिल भरण्यास उशीर झाला तर तुम्हाला जास्त व्याज आकारला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला तुमच्या घर भाड्यापेक्षा जास्त व्याज किंवा दंड शुल्क भरावे लागू शकते.

तथापि, तुम्ही क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले तर तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होणार नाही. जर तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्ड पेमेंट करण्यास वचनबद्ध असाल तर,तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून घर भाडे भरण्यास हरकत नाही. त्याच वेळी, काही बँका आपल्या ग्राहकांवर क्रेडिट कार्डद्वारे भाडे भरण्यासाठी एक्स्ट्रा चार्ज लावतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Credit Card for House rent Payment Benefits and loss and effects on credit score on 07 November 2022.

हॅशटॅग्स

Credit card payment(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x