23 November 2019 8:03 AM
अँप डाउनलोड

कांदा-टोमॅटो रस्त्यावर फेकण्याची वेळ, अर्थमंत्री म्हणतात शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार?

नवी दिल्ली : बजेट २०१९ आज लोकसभेत अर्थमंत्री पियुष गोयल सादर करत आहेत. सकाळी ११ वाजता अरुण जेटली यांच्या अनुपस्थितीत हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल हे यंदाचा हंगामी अर्थसंकल्प सादर करत आहेत.

२०१९ हे निवडणूक वर्ष लक्षात असल्याने यामध्ये निवडणूकपूर्व घोषणांचा अधिक समावेश असण्याची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. लोकसभा बरखास्त होण्याला आणि लोकसभा निवडणुका जाहीर होण्याला कमी कालावधी असल्याने सरकार दूर दृष्टिकोनातून विचार करण्यापेक्षा संभाव्य मतदारांना जास्तीत खुश करण्याचा प्रयत्न करेल असं अनेकांना वाटत आहे.

दरम्यान, २०२० पर्यंत प्रत्येक भारतीयाला घर मिळणार असून आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार अशी घोषणा पियूष गोयल यांनी केली. तसेच देशातून घराणेशाही, भ्रष्टाचार आमच्या सरकारने दूर केला. भारत अत्यंत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरली आहे. आमच्या सरकारने पारदर्शकतेचे नवे युग आणले आहे आणि आम्ही भ्रष्टाचारमुक्त सरकार चालवलं. यापूर्वी यूपीए सरकारच्या सत्ताकाळात अर्थव्यवस्थेवर प्रचंड बोजा वाढला होता जो आमच्या सरकारने मागील ५ वर्षात कमी केला, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1049)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या