13 May 2021 3:08 AM
अँप डाउनलोड

शिवसैनिकांनो! परत सांगतो औकातीत रहा, हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा

रत्नागिरी: सध्या नारायण राणे आणि शिवसेनेमध्ये वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने विषय अधिक वाढल्यास तो राणेँपेक्षा शिवसनेसाठी अधिक नुकसान करणारा शक्यता आहे. त्यात राणे यांच्याकडे सुद्धा आक्रमक कार्यकर्त्यांच्या फौजा असल्याने त्यांच्याकडे लांबूनच पुतळे जाळण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. त्यात जर वाघाची डरकाळी म्हणत राणेंच्या अंगावर गेल्यास उलटा प्रसाद मिळण्याची शक्यता अधिक आहे आणि त्यामुळे लांबूनच विरोधाचे कार्यक्रम आटपले जात आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

स्वाभिमानी पक्षाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आक्रमकता चांगलीच ठाऊक असून ते बिनधास्त आहेत असंच एकूण चित्र आहे. पुतळे जाळने आणि समाज माध्यमांवर पोरकट टिपणी करण्याशिवाय ते राणेंच्या कार्यकर्त्यांना आक्रमक उत्तर देतील अशी अजिबात शक्यता नाही. त्यामुळे काल माजी खासदार निलेश राणेंच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळेच निलेश राणे यांनी शिवसैनिकांची औकात काढली आहे.

नीलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसैनिकांना इशारा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर गंभीर आरोप केल्याच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी नीलेश राणे यांचे दोन ठिकाणी पुतळे जाळले होते. या पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी शिवसैनिकांवर बोचरी टीका केली. ट्विटमध्ये नीलेश राणे म्हणतात, मान सन्मान द्याल तर मान सन्मान मिळेल. गल्लीतल्या कुत्र्यांसारखं काही शिवसैनिकानी माझे दोन तीन ठिकाणी पुतळे जाळले. हिंमत असेल तर समोर या आणि परत जाऊन दाखवा. परत सांगतो अवकातीत रहा ठाकरेंची अब्रू वाचवा.

हॅशटॅग्स

#Nilesh Rane(59)#Shivsena(1081)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x