29 May 2022 4:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
x

राज ठाकरे नाणारमधील 'गुजराती-मारवाडी'च्या मुळाशी जाणार

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणारवासियांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले असून त्यांनी नाणार मधील जमिनी गुजराती आणि मारवाड्यांच्या नावावर कशा चढल्या आणि त्यांना नाणारमधील येऊ घातलेल्या प्रकल्पाची माहिती सरकारमधील कोणत्या लोकांनी दिली ते बाहेर येणं गरजेचं आहे अशी थेट भूमिका घेतली आहे.

जर नाणारमधील स्थानिकांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असेल आणि त्या प्रकल्पामुळे जर कोकणातील निसर्गाला धोका निर्माण होणार असेल तर नाणार मध्ये प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प होणार नाही म्हणेज नाही अशी परखड भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांनी नाणारवासियांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि सरकारला थेट इशारा देताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी थेट नाणार प्रकल्पासाठी काम करणाऱ्या कंपनीचे मुंबई स्थित ताडदेव येथील कार्यालय फोडले.

नाणारमध्ये राजकीय वातावरण तापले असताना लवकरच उध्दव ठाकरे नाणारमध्ये सभा घेणार असले तरी नाणारवासी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर प्रचंड नाराज असून त्यांनी थेट उद्धव ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसनेकडे असलेल्या उद्योग खात्यानेच नाणार प्रकल्पासंबंधित अध्यादेश काढला होता. त्यामुळे एकूणच कोकणातील जनतेचा शिवसेने विरोधात रोष वाढताना दिसत आहे तर नाणारच्या प्रक्लबाधितांना राज ठाकरे अधिक विश्वसनीय वाटू लागले असल्याचे एकूणच चित्र आहे.

कोकणात आणि विशेष करून नाणार मध्ये शिवसेनेचे आमदार आणि खासदार असल्याने तो रोष अधिकच वाढत आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x