17 May 2021 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर संपूर्ण पोलीस दल कोरोना आपत्तीत लोकांसाठी कर्तव्यावर | तर राज्याचे पोलीस महासंचालक सुट्टीवर
x

जनतेच्या दबावाला सरकार झुकलं, पॉक्सो कायद्यात बदल

नवी दिल्ली : बारा वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘पॉक्सो’ कायद्यात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज घेतला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून पॉक्सो कायद्यात बदल करण्याबाबत अध्यादेश मंजूर करण्यात आला आहे. या आधी केंद्र सरकारकडून १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते.

उत्तर प्रदेशातील उन्नाव आणि जम्मू काश्मीर मधील बलात्कारांच्या घटनांनी देश विदेशातील वातावरण ढवळून निघालं असताना सर्वच थरातून मोदी सरकारवर दबाव वाढत होता. विरोधकांनी तर भाजप सरकारला चांगलंच धारेवर धरलं होत. सर्वच बाजूंनी वाढलेला दबाव बघून अखेर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी आधीच पॉक्सो कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील असं म्हटलं होत आणि देशभरातील वाढत्या दबावाखाली सरकारला अखेर हा निर्णय घ्यावा लागला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1545)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x