15 May 2021 11:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
आपला शत्रू एक बहुरूपी आहे, तो कपडे बदलून फोटो काढत असतो - सुरेंद्र राजपूत ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या १० दिवसांनी नाशिकमध्ये प्रकटलेले, पण चंद्रकांतदादा म्हणाले फडणवीस आणि मी.... कोणत्या फेक न्यूज फॉलो करते ही? | म्हणाली, समजलं की ते गंगा नदीतील नाही तर नाजयेरियातील फोटो राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस
x

VIDEO: बुलडोझरने हटवला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, काँग्रेसविरुद्ध संताप

Chhatrapati Shivaji Maharaj statue at Chhindwara Area, Madhya Pradesh congress Kamal Nath government

छिंदवाडा: मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने अशी विचित्र पद्धतीने काढल्यामुळे अनेक शिवप्रेमींनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. दरम्यान , महाराष्ट्रातून देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शिवरायांचा अपमान केल्यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती.

BhagyaVivah Marathi Matrimonial

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने आणि मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करुन शिवसेना आणि काँग्रसेवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले ‘प्रेम’ दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल भारतीय जनता पक्षाने विचारला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा विचित्र पद्धतीने हटविण्यात आला. मध्य प्रदेशात छिंदवाडा परिसरातील ही मूर्ती काँग्रेस सरकारने अशा विचित्र पद्धतीने हटवल्याने प्रचंड चीड व्यक्त करण्यात येतं आहे. महाराष्ट्रात शिवसेना काय भूमिका मांडणार ते पाहावं लागणार आहे.

 

Web Title: Madhya Pradesh congress Kamal Nath government demolished Chhatrapati Shivaji Maharaj statue at Chhindwara Area.

हॅशटॅग्स

#Congress(490)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x