16 December 2024 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

शपथविधी दिवशीच दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक, बीफ डिशची पोस्ट

BJP, Narendra Modi

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या बहुमतानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात एकूण २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान एकीकडे राष्ट्रपती भवनात शपथविधीचा शाही कार्यक्रम सुरु असताना दुसऱ्याबाजूला दिल्ली भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यावेळी हॅकर्सनी वेबसाईटच्या होमपेजवर गोमांस म्हणजेच बीफ रेसिपी पोस्ट केली. या रेसिपीसोबत Hacked by ‘Shadow_V1P3R’ असा मेसेजही लिहिण्यात आला होता.

वेबसाईटच्या होमपेजवर एका बीफ डिशचा फोटो पोस्ट करण्यात आला होता ज्याच्याखाली ‘बीफ फ्राय’ असं लिहिण्यात आलं होतं. या फोटोच्या खाली बीफची संपुर्ण रेसिपी पोस्ट करण्यात आली होती. याशिवाय नॅव्हिगेशन बारसोबतदेखील छेडछाड करत भारतीय जनता पक्षाऐवजी बीफ लिहिण्यात आलं होतं. म्हणजे ‘About BJP’ ऐवजी ‘About Beef’ तर ‘BJP History’ ऐवजी “Beef History’ असा बदल करण्यात आला होता. होमपेजवरील इतर कोणत्या गोष्टीत मात्र बदल करण्यात आला नव्हता. असं असलं तरी काही वेळाने वेबसाईट पुर्ववत झाली.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x