28 June 2022 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
नागपूर-बुटीबोरी मार्गावर 6 पदरी उड्डाणपूल | 15 मिनिटांत 19 किमीचं अंतर कापता येईल - नितीन गडकरी एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांना या 'गेम प्लॅन' पासून ठेवलंय अंधारात | शिंदे आणि भाजपचा गेम प्लॅन बाहेर येतोय Multibagger Penny Stocks | हा 3 रुपयांचा पेनी शेअर करतोय मालामाल | आजही खरेदीला खूप स्वस्त Inflation Effect | पीठानंतर आता तांदूळ अजून महागणार आहे | तुमच्या किचनचा खर्च वाढणार Multibagger Stocks | तुम्ही सुद्धा असे शेअर निवडा | या शेअरने फक्त 10 महिन्यात 960 टक्के परतावा दिला Demat Deactivated | तुमचे डीमॅट खाते डिऍक्टिव्हेट होईल | फक्त 3 दिवस उरले | हे काम लवकर करा PPF Investment | मुलाच्या नावेही उघडता येईल पीपीएफ खाते | फायद्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या
x

लोकांच्या कॉम्पुटरवर वॉच? हॅकर्सकडून भाजप-IT सेलची वेबसाइटच हॅक आणि तंबी

हैदराबाद : भारतीय जनता पक्षाची आयटी सेलची वेबसाइट bjpitcell.org हॅकर्सने हॅक केली असून भाजपला डिजिटल दणका दिला आहे. तसेच त्यावर भाजपला तंबी देणारा संदेशसुद्धा देण्यात आला आहे. त्यावर एक संदेश सोडताना म्हटले आहे की, खासगी संगणकावर लक्ष ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे तो मागे घेण्यात यावा. तसेच भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या सरकारचा निर्णय मागे न घेतल्यास आम्ही भाजपच्या गुन्हेगारीचे पुरावे थेट जगासमोर ठेऊ, अशी धमकीच या हॅकर्सने मोदी सरकारला दिली आहे.

कारण मोदी सरकार आता तुमच्या कम्प्युटरमधील प्रत्यके हालचालींवर बारीक नजर असणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशातील तब्बल १० मोठ्या एजन्सींना तुमच्या खासगी कम्प्युटरवर थेट नजर ठेवण्यासाठी परवानगी बहाल करण्यात आली आहे. या सर्व संबंधित १० एजन्सी एकप्रकारे तुमच्यासाठी गुप्तहेराचेच काम करणार असून त्या केव्हाही तुमच्या खासगी कम्प्युटरमधील माहिती तपासू शकतात. त्यामुळे तो कम्प्युटर तुमच्या मालकीचा जरी असला तरी त्याचा वापर आणि साठवलेल्या माहितीची काळजी घ्या. परंतु, हुशार तांत्रिक हाकेर्सने भाजपला चांगलाच डिजिटल झटका दिला आहे. भाजपला याची चुणूक लागताच त्यांनी वेबसाइट पुन्हा उपडेट करण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x