12 December 2024 7:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Mumbai Crime | महाराष्ट्राची राजधानी हादरली! सरकारी वसतिगृहात 19 वर्षाच्या विद्यार्थीनीवर अत्याचार आणि विवस्त्र करून हत्या

Highlights:

  • Mumbai Crime
  • आरोपीने हत्येनंतर रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली
  • त्याने एकट्याने कृत्य केलंय की??
  • आरोपीला सुरक्षारक्षक म्हणून कोणी ठेवलं होतं?
  • योग्य सुरक्षा हवी होती,पण सरकारने दिली नाही
Mumbai Crime

Mumbai Crime | चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण शिंदे-फडणवीस सरकार विरोधात समाज माध्यमांवर संतापाची लाट उसळळी आहे. या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरोपीने हत्येनंतर रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची समोर आले आहे. वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. संशयित सुरक्षारक्षक बेपत्ता झाला होता. या सुरक्षा रक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

त्याने एकट्याने कृत्य केलंय की??

त्याने एकट्याने कृत्य केलंय की, त्याच्या जोडीला आणखी कोणी होतं. कारण चौथ्या मजल्यावर ही मुलगी राहत होती. दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर बाकीच्या सगळ्या मुली रुममध्ये राहत होत्या. पण ही मुलगी एकाच रुममध्ये राहत होती अशी मला माहिती मिळाली. तिच्या एकटीची रुम ही चौथ्या मजल्यावर होत्या. खालच्या मजल्यावरच्या मुली तिला म्हणाल्या देखील की, तू एकटी वर राहण्यापेक्षा खाली राहायला ये.

आरोपीला सुरक्षारक्षक म्हणून कोणी ठेवलं होतं?

वास्तविक आरोपीला सुरक्षारक्षक म्हणून कोणी ठेवलं होतं. त्याची माहिती घेतली होती. असंही समजतं आहे की, त्याचे वडील आधी तिथे नोकरीला होते आणि नंतर त्याला तिथे नोकरीला लावलं. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे.’ ‘काही जणं म्हणाले की, तिथल्या दरवाज्याच्या आतल्या कड्या आहेत, म्हणजे आतून लावल्या जाणाऱ्या कड्या या फार तकलादू आहेत. असं एका अधिकाऱ्याने चौकशीत सांगितलं. जरा धक्का मारल्यावर उघडतील अशा त्या कड्या आहेत.

योग्य सुरक्षा हवी होती,पण सरकारने दिली नाही

महिला वॉर्डनचा दावा आहे की त्यांना योग्य सुरक्षा हवी होती. पण सरकारने दिली नाही. कोविडच्या काळात सरकारने पुरुष स्टाफची कपात केली होती. पीडित मुलीची रूममेट होती. पण तिनं परीक्षा संपल्यानंतर वसतिगृहाची खोली सोडली. मुलींच्या वसतिगृहात महिला मदतनीस का नव्हत्या? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मरीन लाईन वसतिगृहात वॉर्डन या प्राध्यापिका आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या 17 वर्षांपासून त्यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

Latest Marathi News : Mumbai Crime murder of 19 years old lady in Girl’s hostel Marine Drive check details on 07 June 2023.

हॅशटॅग्स

#Mumbai Crime(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x