1 December 2022 9:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Surya Rashi Parivartan | या 3 राशीच्या लोकांनी 16 डिसेंबरपासूनचा काळ सांभाळून पार करावा, कोणत्या राशी पहा RBI e-Rupee | आरबीआय ई-रुपयासाठी इंटरनेट लागणार? सर्वसामान्यांना कसा फायदा होणार समजून घ्या EPF Pension Limit | खासगी नोकरदारांना आता 25000 रुपये पेन्शन मिळणार, तुमचे पैसे 333 टक्क्यांनी असे वाढणार पहा ITR Filling | तुमची यामार्गे सुद्धा कमाई होते का? इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते, टॅक्स भरावा लागणार Quick Money Share | झटपट पैसा! या शेअरने 3 महिन्यांत 147 टक्के परतावा दिला, वेगाने पैसे वाढवत आहे हा स्टॉक, नोट करा Money From IPO | हा IPO दुसऱ्या दिवशी 6 पट सबस्क्राइब झाला, ग्रे मार्केटमध्ये 55 रुपयांचा प्रीमियम, मोठ्या कमाईचे संकेत Equity Mutual Fund | इक्विटी फंडात पैसे गुंतवता? चांगले फंड कसे निवडावे आणि खराब फंडमधून कधी बाहेर पडावे? जाणून घ्या
x

मोदी लाट कर्नाटकापासून ओसरणार ? ओपिनियन पोल

कर्नाटक : कर्नाटक मध्ये पुन्हां काँग्रेसचं सत्तेत येणार असल्याचे ओपिनियन पोलचे निकाल सांगत आहेत. सध्या कर्नाटकातील राजकीय स्थिती भाजला पोषक नसल्याचे समोर आले आहे. भाजप पुरेपूर प्रयत्नं करत असली तरी पुन्हां सिद्धरमय्याच मुख्यमंत्री होतील असं हा रिपोर्ट सांगतो.

महिनाभर अंतर असलेल्या कर्नाटक निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल असं या ओपिनियन पोल मध्ये संकेत मिळत आहेत. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपलाच विजय होईल असं सांगत आहेत. आजतक हा वृत्त वाहिनीने हा पोल दिला आहे. इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइट्सने मिळून हा ओपिनियन पोल केला आहे.

कर्नाटक विधानसभेत एकूण २२५ सदस्य संख्या असून पोल नुसार ९० ते १०१ जागा जिंकून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल तर प्रमुख विरोधी पक्ष भाजप केवळ ७८ ते ८६ जागांवर समाधान मानेल. तर जेडीस सुद्धा ३४ ते ४३ जागा पटकावेल असं म्हटलं आहे.

कर्नाटकातील एकूण २२४ विधानसभा मतदारसंघात सर्वे घेण्यात आला असून त्यात २७,९१९ लोकांनी आपलं मत नोंदवलं आहे. सर्वेक्षणात शहरातील ३८ टक्के आणि ग्रामीण भागात ६२ टक्के लोकांनी सहभाग घेतला असून १७ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान हा सर्वे घेण्यात आला आहे.

सर्व्हेत ५२ टक्के लोकांना काँग्रेसचा लिंगायच कार्डचा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरेल असं वाटतं तर २८ लोकांना तो मुद्दा जास्त महत्वाचा वाटत नाही. राहुल गांधी यांच्या मंदिर भेटीचा पक्षाला फायदा होईल असं ४२ टक्के लोकांना वाटत तर ३५ टक्के लोकांना तसं नाही वाटत. तर मुख्यमंत्री पदासाठी ३३ टक्के लोकांना सिद्धरमय्या हे मुख्यमंत्री होतील असं वाटत तर २६ टक्के लोकांना येदीयुरप्पा मुख्यमंत्रीपदी बसतील असं वाटत.

हॅशटॅग्स

#Amit Shah(262)#Narendra Modi(1662)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x