12 December 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

गोवा ठरलं देशातील पहिलं कोरोना मुक्त राज्य; देशही असाच जिंकेल

Covid 19, Corona crisis, Goa Corona Free

पणजी, १९ एप्रिल: देशात एकीकडे कोरोना विषाणूचे थैमान कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही. तर दुसरीकडे एक खूशखबर आली आहे. रविवारचा दिवस समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गोव्यासाठी नवे यश घेऊन येणारा ठरला आहे. येथील कोरोना विषाणूबाधित सर्व रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे एकूण सात प्रकरणे समोर आली होती. यातील सहा यापूर्वीच ठीक झाले होते. अखेरच्या रुग्णाचा अहवाल रविवारी निगेटिव्ह आला. त्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची माहिती दिली. त्यांनी टि्वट केले की, आनंद आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे अखेरच्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. डॉक्टर आणि सहायक कर्मचारी यासाठी कौतुकास पात्र आहेत. गोव्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही.

छोटं राज्य असलं तरी गोव्यात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. पोलीस, स्थानिक प्रशासन, पर्यटन विभाग यांच्यासोबतच आम्हाला गोव्याच्या नागरिकांकडूनही चांगलं सहकार्य मिळालं. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रत्येक सूचना अमलात आणली. अनेक सण आले परंतु, इथल्या कोणत्याही धर्माच्या नागरिकांकडून कोणतीही नवी समस्या निर्माण झाली नाही. नियमानुसार, गोव्याला काही सूट मिळू शकते, त्यावर आम्ही विचार करत आहोत, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं.

गोव्यात २५ मार्च रोजी पहिला कोरोनाबाधित सापडला होता. त्यानंतर आम्ही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला. संशयितांना क्वारेंटाईन केले. तसेच राज्यात विमानतळावरून आलेल्या प्रत्येकाला क्वारेंटाईन केले. राज्यात १० ते १२ क्वारेंटाईन सेंटर सुरू केली. आमचे आरोग्य मंत्रालय, आरोग्य कर्मचारी यांनी चांगले काम केले. त्यामुळे हे सर्व शक्य झाले.

 

News English Summary: On the one hand, the corona virus does not appear to be on the decline. On the other hand there is a good news. Sunday is a day of new success for Goa along the coast. All Corona virus patients here have recovered. A total of seven cases of corona virus were reported in the state. Six of them had already recovered. The last patient report came out negative on Sunday. He was later discharged from the hospital.

News English Title: Story Goa wipes Covid 19 slate clean count comes down to zero Corona Crisis News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x