15 December 2024 5:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये
x

११७ रुग्ण वाढल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २८०० पार

Corona Crisis, Covid19, Maharashtra

मुंबई, १५ एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा विळखा आणखी वाढत चालला आहे. राज्यात बुधवारी कोरोनाचे आणखी ११७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८०१ वर पोहचला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिला आहे. आज आढळलेल्या ११७ कोरोनाबाधितांपैकी ६६ रुग्ण मुंबईचे आहेत तर ४४ रुग्ण हे पुण्याचे आहेत.

महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. शासकीय यंत्रणा, पोलीस, डॉक्टर, आरोग्य अधिकारी हे सगळेच जण करोनाच्या संकटाशी सामना करत आहेत. मात्र महाराष्ट्रात करोनाग्रस्त कमी होण्याऐवजी वाढत चालले आहेत. देशभरात ३ मेपर्यंत लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. या दरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये असं आवाहन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही १४ एप्रिलला पुन्हा एकदा केलं.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १,२७,१४७ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर २० लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या २०,०८,१६४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ४,८६,२४७ लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत.

 

News English Summary: The outbreak of corona virus is increasing in Maharashtra. Another 117 coronary patients were found on Wednesday in the state. Therefore, the number of coronary arteries in the state has reached 2801, informed the state health department. Of the 117 coronary arteries detected today, 66 patients are from Mumbai and 44 patients are from Pune.

News English Title: Story corona virus Maharashtra reports 117 new cases count goes up to 1801 Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x