19 August 2019 3:23 AM
अँप डाउनलोड

अब्दुल सत्तार भाजपात आल्यास औरंगाबाद भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता

अब्दुल सत्तार भाजपात आल्यास औरंगाबाद भाजपमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता

औरंगाबाद : काँग्रेसचे सिल्लोडमधील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षात घेण्यास भारतीय जनता पक्षात प्रवेश देण्यावरून जोरदार विरोध होत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवरुन अब्दुल सत्तार यांच्या पक्षप्रवेशाबाबत हस्तक्षेप होण्याची शक्यता असून स्थानिक नेते मंडळी नक्की काय निर्णय होतो त्यावर बारीक लक्ष ठेवून असल्याचं वृत्त आहे.

सिल्लोडमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आणि काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना विरोध असल्याचे कळवले दुसरीकडे, सहा जून रोजी आपल्या भाजप प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचे अब्दुल सत्तार यां जाहीर केलं होतं. परंतु, आज ७ जून उजडलं, तरी भारतीय जनता पक्षातील प्रवेश अजून मार्गी लागलेला नाही. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे अब्दुल सत्तार यांचा भाजप प्रवेश होणार की नाही याबाबत आता संभ्रम निर्माण होऊ लागला आहे.

भाजपचे सिल्लोड तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोटे आणि माजी आमदार सांडू पाटील लोखंडे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना आमदार अब्दुल सत्तार यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध दर्शवला आहे. अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध करण्यासाठी ४ जून रोजी सिल्लोड येथे बैठकही आयोजित करण्यात आली होती.

अनुरूप वधू - वर सुचक मंडळ

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या