2 July 2020 9:39 PM
अँप डाउनलोड

मतदारांनी सेनेला मतं दिली; आता सेना नेत्यांची मुलं मराठी उद्योजकांकडून खंडण्या मागत आहेत

Shivsena, MLA Bharat Gogawale

महाड : लोकसभा निवडणुकीत मतदाराने भाजपसोबत शिवसेनेच्या खासदारांना देखील कोणताही कर्तृत्व नसताना भरभरून मतदान केलं. मात्र आता त्याच मतदारांकडून शिवसेनेच्या आमदारांची मुलं खंडण्या मागत असल्याचे समोर आलं आहे. रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांच्या मुलाविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास गोगावले असे आमदार भरत गोगावले यांच्या मुलाचे नाव आहे. मुंबईतीली भांडुप येथील वाहतूक व्यावसायिक राजेश शेटकर यांच्याकडे महाड एमआयडीसीत व्यावसाय करण्यासाठी विकास गोगावले यांनी खंडणीसाठी राजेश यांना धमकावल्याचा आरोप आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राजेश शेटकर यांना मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये बोलावून धमकावल्याप्रकरणी विकास गोगावले यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणी न दिल्यास तक्रारदार राजेश शेटकर यांच्या वाहनांची तोडफोड करण्याची विकास गोगावलेंनी धमकी दिली होती. दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्ये उभे असलेल्या राजेश कार्गो अँड मुव्हर्स प्र. लि. या ट्रान्सपोर्ट कंपनीचे दोन कंटेनर फोडून चालकांकडील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास करण्यात आला आहे. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात १० ते १२ अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल रात्री कंपनीतून न्हावा शेवा बंदराकडे जात असताना दहा ते बारा अज्ञात इसमांनी बिरवाडी टाकीकोंड या ठिकाणी हे कंटेनर थांबवून त्यांच्यावर हल्ला केला. या दोन्ही कंटेनरच्या काचा फोडल्या. एका कंटेनरचा चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तर दुसरा कंटेनरचालकाकडील साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम आणि अडीच हजार रुपये किंमतीचा मोबाईल या हल्लेखोरांनी लंपास केला. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात दरोडा, मारहाण आणि नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Shivsena(885)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x