17 March 2025 7:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, शेअर्स प्राईसवर होणार परिणाम - NSE: YESBANK Rattan Power Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ आला पेनी स्टॉक, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनीचा मल्टिबॅगर शेअर खरेदी करा, शेअर प्राईस 42 रुपये, मिळेल 56% परतावा - NSE: IRB Horoscope Today | 18 मार्च 2025, कसा असेल तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस, तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 18 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | शेअर प्राईस 1 रुपया 49 पैसे, 492% परतावा देणारा पेनी स्टॉक फोकसमध्ये - NSE: GTLINFRA TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, एचएसबीसी ब्रोकरेजकडून BUY रेटिंगसह टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

राज्यातील धार्मिक स्थळे पाडव्यापासून खुली होणार | राज्य सरकारचा निर्णय

Maharashtra government, Religion temples, Reopen, Unlock 5

मुंबई, १४ नोव्हेंबर: राज्यातील धार्मिक स्थळांचे दरवाजे अखेर खुले होणार आहेत. पाडव्यापासून म्हणजेच सोमवार दि. १६ नोव्हेंबरपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा! मंदिरात चपला बाहेर काढून प्रवेश करायचा असतो, पण तोंडावरील मास्क मात्र सक्तीचा आहे हे विसरू नका. मंदिरे उघडतील, इतर प्रार्थनास्थळे उघडतील. आपण शिस्त पाळली तरच देवांचे आशीर्वाद आपल्याला व महाराष्ट्राला मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे. प्रथेप्रमाणे अभ्यंगस्नान आणि नरकासुर वधही झाला. नरकासुररूपी चिराटी फोडली असली तरी वर्षभर करोनारूपी नरकासुराने घातलेला धुमाकूळ विसरता येणार नाही. हा राक्षसही हळूहळू थंड पडत असला तरी बेसावध राहून चालणार नाही. राज्यातील जनतेने या काळात शिस्तीचे पालन केले. त्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची स्थिती हाताबाहेर गेली नाही. महाराष्ट्रावर साधू-संतांची, देव -देवतांची नेहमीच कृपा राहिली आहे. तरीही शिस्त, सावधगिरी म्हणून होळी, गणेशोत्सव, नवरात्र, पंढरीची वारीही झाली नाही. इतकेच नाही तर इतर धर्मियांनीही ईद, माऊंट मेरीसारख्या जत्रांसंदर्भात शिस्त पाळलीच.”

 

News English Summary: The doors of religious places in the state will finally open. From Padva i.e. on Monday. Chief Minister Uddhav Thackeray has announced that temples of all religions including temples will be opened in the state from November 16. This is not just a government order, understand ‘Shri’s wish! You have to take off your slippers and enter the temple, but don’t forget that a face mask is mandatory. Temples will open, other places of worship will open. Chief Minister Uddhav Thackeray has expressed confidence that we and Maharashtra will get the blessings of God only if we follow discipline.

News English Title: Maharashtra government allows religion temples Charch etc to reopen from Monday News Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x