मुंबई : प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर यांना सांगलीतून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, आता पडळकर हे संभाजी भिडे यांचे कट्टर समर्थक असल्याची छायाचित्रे सार्वजनिक झाल्याने प्रकाश आंबेडकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. एवढेच नाही तर, पडळकर यांनी भिडे यांना तब्बल अकरा लाख रुपयांची मदत केल्याचा संदेश सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामुळे पडळकर अडचणीत येण्याची शक्यता दाट शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर हे भिडे गुरूजींचे कट्टर विरोधक आहेत. भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणात भिडे गुरूजी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंबेडकर यांनी तीव्र आंदोलन केले होते. आंबेडकरी जनतेमध्येही भिडे यांच्याविषयी तीव्र संताप आहे. भिडे यांच्यासोबत पडळकर यांचे खाक्या रंगाच्या अर्ध्या विजारातील छायाचित्रे दिसत आहेत.

कट्टर संभाजी भक्त अशा अवतारातील पडळकर यांची ही छायाचित्रे पाहिल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

प्रकाश आंबेडकरांकडून भिडेंच्या धारक-याला उमेदवारी गोपीचंद पडळकरांचे फोटो उघड