15 December 2024 9:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

महाराष्ट्र पोलीस भरती | १२५३८ जागांपैकी पहिल्या टप्प्याची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात

Maharashtra Police Recruitment 2021, free job alert, majhi naukri, Freshersworld

नागपूर, ११ जानेवारी: मागील काही दिवसांपासून राज्यातील पोलिस, भरतीबाबत चर्चा सुरु असतानाच आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी पोलीस खात्यात १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ५३०० जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तसेच १२५३८ जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ते आज (११ जानेवारी) नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्य सरकार पोलीस भरतीच्या निर्णयावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून ‘एसईबीसी’च्या आरक्षणाशिवाय राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. पण या निर्णयाला मराठा संघटनांकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात आहे. अनिल देशमुखांच्या आजच्या घोषणेनंतर पोलीस भरती प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचं निश्चित झालं असलं तरी मराठा संघटना याबाबत कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

News English Summary: Home Minister Anil Deshmukh has made a big announcement in the last few days while discussions have been going on about police recruitment in the state. He announced that recruitment process will be implemented for 12538 posts in the police department. In the first phase, recruitment process for 5300 posts will be completed. The remaining seats will be filled in the second phase, said Anil Deshmukh. You can read the required details below to get more information. To get private and government jobs alert on your mobile then download Maharashtranama App from google PlayStore to install mobile app. Free Job Alert, Majhi Naukri, freshersworld, mazinaukari.

News English Title: Maharashtra Police Recruitment 2021 for 12538 post notification released free job alert majhi naukri for freshersworld news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(476)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x