7 July 2020 8:32 PM
अँप डाउनलोड

चेहऱ्यावर तलवारीनं वार करुन एनसीपीच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

NCP, Loksabha Election

बीड: एनसीपीच्या माजी नगरसेवकाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. परळी येथील उड्डाणपुलाखाली पांडुरंग गायकवाड यांची तलवारीनं वार करून हत्या करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही अज्ञातांनी गायकवाड यांच्यावर हल्ला केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड यांची पत्नी राष्ट्रवादीची नगरसेविका आहे. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

परळी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांची पहाटेच्या सुमारास परळीतील उड्डाणलाखाली हत्या करण्यात आली. काही अज्ञातांनी त्यांच्या चेहऱ्यावर तलवारीनं सपासप वार केले. या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र अंतर्गत वादातून ही हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई गायकवाड या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत. या हल्ल्यानंतर मारेकरी फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#NCP(296)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x