नवी दिल्ली : फोर्ब्स’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज त्याच अब्जाधीशांची संख्या ११९ इतकी झाली आहे. जागतिक आकडेवारीतील अब्जाधीशांच्या संख्येनुसार भारताने अमेरिक आणि चीनसोडून सर्वच देशांना मागे टाकले आहे. परंतु मोठं मोठ्या अब्जाधीशांचे आकडे वाढत असताना, त्यातून देशात वाढत जाणारी श्रीमंत आणि गरिबांमधील दरी दुर्लक्षित होत आहे.

देशाची एकूण राष्ट्रीय संपत्ती ही काही मोजक्या श्रीमंतांच्या हातात जात असून दारिद्य रेषेखालील जनतेचा वाढत आकडा हा हेलावून टाकणारा आहे. देश आर्थिक दृष्ट्या सशक्त आणि संपन्न ठेवायचा असेल तर प्रथम देशाच्या आर्थिक संपत्तीचे प्रमाण सुद्धा सामान असणे गरजेचे आहे. राष्ट्रीय संपत्ती अशा प्रकारे मोजक्या हातात जात असून, देशातील वाढता दारिद्र रेषेखालील जनतेचा आकडा हा भविष्यात देशाला आपल्याच देशातील अब्जाधीशांच्या ‘आर्थिक गुलामीत’ ढकलून देईल याची कोणालाच अजून जाणीव झालेली आहे.

चीनच्या अर्थव्यवस्थेने जेव्हा २००६ मध्ये २.३ ट्रिलियनचा आकडा गाठला होता, त्यावेळी चीनमध्ये फक्त १० अब्जाधीश होते. परंतु भारताच्या अर्थव्यवस्थेने जेव्हा हा आकडा गाठला होता तेव्हा भारत चीनच्या अब्जाधीशांच्या आकड्याचा आठ पट अधिक म्हणजे तब्बल ८४ अब्जाधीश होते. भारतात २०१४ मध्ये विराजमान झालेल्या मोदी सरकारने देशातील काळ्या पैशाचा धिंडोरा पिटला आणि आम्ही कसे गरिबांसाठी राबणारे आहोत असा भास निर्माण करायला सुरुवात केली. परंतु त्यांच सरकार आल्यावर अगदी कमी कालावधीत याच अब्जाधीशांची संख्या ८४ वरून थेट ११९ झाला आहे.

या साली म्हणजे २०१८ मधील आकडेवारी नुसार भारतातील प्रति व्यक्ती उत्पन्न वाढून १ लाख १२ हजार म्हणजे प्रति दिन ‘प्रति व्यक्ती’ कमाई ही ३०६ रुपये आहे. परंतु दुसरं मोठं वास्तव या आकडेवारीत समोर आलं आहे ते म्हणजे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशातील २९ कोटी नागरिकांची प्रति दिन कमाई ही ३० रुपयांपेक्षा सुद्धा कमी आहे आणि हे भयानक आहे. त्यामुळे देशातील वाढत्या दारिद्र्य रेषेखालील जनतेची संख्या पाहून आपण ‘मानवी विकास’ करण्यात किती मागासलेले आहोत हे समोर येत आहे.

In india there is lot of gap between poor and rich as per numbers says in economy