20 May 2022 8:53 AM
अँप डाउनलोड

जळगावात खडसे विरोधात प्रचार करतील या भीतीने खाविआ व भाजप युती तुटली

मुंबई : जळगाव महानगर पालिका निवडणुकीसाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि खान्देश विकास आघाडीचे सर्वेसेवा सुरेशदादा जैन यांचे भाजप-शिवसेना युतीचे सर्व प्रयत्नं एकनाथ खडसेंच्या एका अप्रत्यक्ष धमकीने हाणून पाडले आहेत. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी युती झाल्यास विरोधात प्रचार करण्याचे संकेत देताच युतीचा निर्णय बासनात गुंडाळण्यात आला.

दोन्ही पक्षांनी एकमेकांना प्रतिसाद न दिल्याचे कारण जरी पुढे करण्यात येत असले तरी त्यामागे एकनाथ खडसे हेच कारण असल्याची चर्चा जळगाव महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने रंगली आहे. परंतु त्यानिमित्ताने जळगाव मधील एकनाथ खडसेंची ताकद सुद्धा अप्रत्यक्षरित्या सिद्ध झाली आहे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन अडचणीत सापडल्याची चिन्ह आहेत.

मैत्रीखातर सुरेश जैन हे जलसंपदामंत्री गिरीश महाजन सांगतील ती पूर्वदिशा असे निर्णय घेताना दिसत होते. खांदेश विकास आघाडीकडे कोणताही प्रस्ताव आला नाही असं कारण जरी पुढे करण्यात आलं असल तरी त्यामागे खडसेंची जळगावातील ताकद हेच कारण असल्याची राजकीय चर्चा जळगावात रंगली आहे. त्यामुळे खसडेंनी विरोधाचे संकेत देताच युतीचे सर्व प्रयत्नं फोल ठरले आहेत.

हॅशटॅग्स

BJP(446)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x