20 April 2024 11:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची महिलांच्या फायद्याची खास योजना, अल्पावधीत मिळतील 2,32,044 रुपये Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना 'या' बँकेत FD वर बंपर परतावा, तब्बल 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवा Gold Rate Today | बोंबला! आजही सोन्याचा भाव मजबूत उसळला, तुमच्या शहरातील कॅरेट प्रमाणे नवे दर तपासून घ्या Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला
x

पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही: देवेंद्र फडणवीस

EVM, CM Devendra fadnvis

पाथर्डी: ‘दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजोरी व मुजोरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत, असं सांगत, ‘पुढची २५ वर्षे आम्ही सत्तेतून हटणार नाही,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं. महाजानदेश यात्रेनिमित्त बाजार समितीच्या आवारात आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसला धारेवर धरले. ‘कोणत्याही यात्रेचे एक दैवत असते. मी काढलेल्या यात्रेचे दैवत हे राज्यातील जनता असून आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासाठी व जनतेशी संवाद साधण्यासाठी मी महाजानदेश यात्रा काढलेली आहे असं फडणवीस म्हणाले.

सत्तेत असताना जनतेची कामे केली नाहीत. त्यामुळे जनता त्यांच्यापासून दूर गेली आणि ते ईव्हीएमला दोष देतात. ईव्हीएम हे मशीन आहे. ईव्हीएम त्यांना हरवत नाही तर मतदार त्यांना हरवतो. कारण, आम्ही जनतेच्या मनात घर केले आहे. पाच वर्षात आम्ही प्रामाणिकपणे कामे केली आलेल्या आव्हानांचा सामना केला व जनतेचे प्रश्न सोडविले. त्यांच्या सत्तेच्या १५ वर्षाच्या काळात जेवढी कामे झाली. त्यापेक्षा जास्त कामे आम्ही पाच वर्षात करून दाखविली. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे व येणारी २५ वर्षे सत युतीचीच येणार असा ठाम विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x