27 July 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

EVM बाबत तंत्रज्ञांशी चर्चा करून व विरोधकांना एकत्र घेऊन प्रकरणाच्या खोलात जाणार

Sharad Pawar, NCP

मुंबई: ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा दावा करणारे एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता निवडणूक अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांची देखील धाकधूक वाढणार आहे. ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये अडचण नसून निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतमोजणीवेळी गडबड होत असल्याचा संशय पवार यांनी कार्यकर्त्यांना संवाद साधताना व्यक्त केला. एनसीपीच्या २० व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

मतमोजणीच्या वेळी होणाऱ्या घोटाळ्याच्या खोलात जाणार असल्याचं शरद पवार म्हणाले. ‘मतदार ज्या ठिकाणी मतदान करतात, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटमध्ये काहीच घोटाळा नाही. पण ज्यावेळी ईव्हीएम निवडणूक अधिकाऱ्यांच्या हाती जाते. त्यांच्याकडून मतमोजणी केली जाते, त्यावेळी काहीतरी गडबड होते. आम्ही काही तंत्रज्ञांशी तसेच या विषयातील तंत्रज्ञान तज्ज्ञांकडून सविस्तर माहिती घेऊन आणि विरोधकांशी चर्चा करून या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत,’ असं शरद पवार कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले.

लोकशाहीत मतदान व मतमोजणीतील घोटाळा मतदारांच्या ध्यानात आल्यास लोकं कायदा हातात घेतील, अशी भीती देखील पवारांनी यावेळी व्यक्त केली. ‘आपण दिलेलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नसल्याचं लोकांच्या लक्षात आल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होईल. लोक आता शांत राहतील. पण भविष्यात असं घडल्यास माणसं कायदा हातात घेतील आणि आम्ही ते होऊ देणार नाही,’ असं शरद पवार यांनी म्हटलं.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x