14 December 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

उपचाराविना बाळाने वडिलांच्या कुशीत प्राण सोडले; यूपीत आरोग्य सुविधांचे तीनतेरा

Uttar Pradesh, Health Infrastructure, Covid 19

ग्रेटर नोएडा, २८ मे: ग्रेटर नोएडातील सेक्टर ३६ मध्ये राहणारे राजकुमार यांच्या मुलाचा उपचारांअभावी मृत्यू झाला. मात्र रुग्णालयात सगळीकडे धावाधाव करूनही ते आपल्या मुलाचे प्राण वाचवू शकले नाहीत. राजकुमार यांनी सांगितले की, ते एका खासगी कंपनीत काम करतात. येथील एका रुग्णालयात त्यांच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, रात्री १० च्या सुमारास त्यांच्या नवजात मुलाची तब्येत बिघडली. मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याचे सांगत रुग्णालय प्रशासनाने त्यांच्या मुलाला डिश्चार्ज दिला.

त्यानंतर राजकुमार दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात गेले. मात्र तिथे मोठा खर्च सांगण्यात आल्याने त्यांनी आपल्या मुलाला घेऊन सरकारी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तिथे मुलांचे डॉक्टर उपलब्ध नव्हते. तसेच रुग्णालयात होते ते डॉक्टर झोपलेले होते. अशाप्रकारे संपूर्ण रात्र या मुलाला उपचारांविना काढावी लागली. अखेरीस पहाटे पाच वाजता एका अँब्युलन्सने या मुलाला नोएडाच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तत्पूर्वीच या मुलाची प्राणज्योत मालवली होती.

दुसरीकडे दिल्लीहून बिहारला आलेल्या श्रमिक मजुराच्या साडेचार वर्षाच्या मुलाचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बिहारमध्ये घडली आहे. दिल्लीहून श्रमिक विशेष ट्रेनने बिहारमधील मुज्जफरपूर रेल्वे स्थानकात घडला आहे. मुलाला भूक लागली असल्याने वडील रेल्वे स्थानकामध्ये दूध मिळतय का शोधत असतानाच या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

तत्पूर्वी उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात मृत वटवाघळं सापडल्याने स्थानिकांमध्ये खळबळ माजली आहे. गोरखपूरमधील बेलघाट परिसरात ही मृत वटवाघळं सापडली आहे. देशात करोनाने थैमान घातला असताना वटवाघळं मृत सापडल्याने स्थानिकांनी भीती व्यक्त केली आहे. स्थानिक करोनाशी संबंध जोडत असताना वनअधिकारी मात्र उष्णतेमुळे वटवाघूळांचा मृत्यू झाल्याचं सांगत आहेत. दरम्यान मृत्यूचं नेमकं कारण माहिती करुन घेण्यासाठी वटवाघळं मृतदेह बरेली येथील पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत पाठवण्यात आले आहेत. पशुवैद्यकीय संशोधन संस्थेकडून रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल असं त्यांनी सांगितलं आहे.

 

News English Summary: Rajkumar’s son, who lived in Sector 36 in Greater Noida, died due to lack of treatment. However, he could not save his son’s life even after rushing to the hospital.

News English Title: Father hugs child wanders in hospital for seven hours baby dies without treatment News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x