11 July 2020 2:42 PM
अँप डाउनलोड

देशभरात डिसेंबरपासून 'ड्रोन'चा व्यावसायिक वापर, धोरण निश्चित

नवी दिल्ली : देशात लवकरच म्हणजे येत्या डिसेंबर पासून ड्रोन’चा व्यावसायिक पद्धतीने वापर करता येणार आहे. त्याबाबतचे धोरण सरकारने निश्चित केले असून, त्यानुसार सरकारची नवी नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

नव्या धोरणानुसार कृषी, आरोग्य आणि आपत्ती निवारण या क्षेत्रामध्ये ‘ड्रोन’चा व्यावसायिक पद्धतीने वापर करण्यास सरकार अधिकृत परवानगी देणार असलं तरी ड्रोन’मार्फत कोणत्याही खाद्यपदार्थांची सेवा देण्यास नव्या नियमावलीत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ड्रोन’च्या व्यावसायिक वापराबाबतचे धोरण सरकारकडून जवळपास निश्चित झाले आहे.

नव्या नियमावलीनुसार ‘ड्रोन’चा वापर ४५० मीटरच्या क्षेत्रातच करता येणार आहे. तसेच विमानतळ, देशाची सीमा, सागरी हद्द, सचिवालये, लष्कराशी संबंधित इमारती आणि क्षेत्र; तसेच इतर महत्वाच्या संवेदनशील ठिकाणी ‘ड्रोन’चा वापर करण्यास नव्या नियमावलीत बंदी घालण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार, नॅशनल रिसर्च ऑर्गनायझेशन अँड सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीच्या ‘ड्रोन’शिवाय इतर ‘ड्रोन’ना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर देण्यात येणार आहे. ‘नवीन धोरणांमुळे भारतात तयार होणाऱ्या ड्रोनचा उद्योग विस्तारण्यास मदत होईल अशी आशा हवाई वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x