26 September 2020 9:18 PM
अँप डाउनलोड

करुणानिधींचे उत्तराधिकारी म्हणून डीएमकेच्या अध्यक्षपदी एम.के. स्टॅलिन यांची निवड

चेन्नई : एम. करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन यांची आज डीएमकेच्या अध्यक्षपदी अधिकृत पणे निवड करण्यात आली आहे. चेन्नईत पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीनंतर पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून स्टॅलिन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

काही दिवसांपासून म्हणजे करुणानिधींच्या मृत्यूनंतर डीएमके पक्षावरील वर्चस्वावरून त्यांच्या कुटुंबीयांमध्येच वाद वाढताना दिसत होते. परंतु आज अखेरीस स्टॅलिन हेच करुणानिधींचे राजकीय वारसदार बनण्यात यशस्वी ठरले असून दुरुईमुरुगन यांची पक्षाच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. स्टॅलिन यांना दीर्घकाळापासून पक्षाच काम संभाळल्याच्या अनुभव होता. विशेष म्हणजे त्यांनी चेन्नईचे महापौरपद आणि तामिळनाडूचे उपमुख्यमंत्रिपद अशी महत्वाची पद भूषवली आहेत.

मागील काही काळापासून म्हणजे करुणानिधींच्या मृत्यूपूर्वी ते पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जवाबदारी सांभाळत होते. तत्पूर्वी स्टॅलिन, दुरईमुरुगन आणि पक्षातील ज्येष्ठ नेते टी. आर. बालू, ए. राजा यांनी करुणानिधींची पत्नी दयालू अम्माल यांची निवास्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती आणि त्यानंतर पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घोषित करण्यात आला.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x