14 December 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

नंदीग्राम हल्ला | ममता बॅनर्जींच्या पायाला प्लॅस्टर | TMC निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार

West Bengal Assembly Election 2021, CM Mamata Banerjee, admitted in hospital, Fracture

कोलकत्ता, ११ मार्च: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राम येथे झालेल्या हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत. याप्रकरणी आता तृणमूल काँग्रेस निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने या हल्ल्याची दखल घेतल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांच्याकडून या घटनेचा अहवाल मागवला आहे. (West Bengal Assembly Election 2021 CM Mamata Banerjee admitted in hospital)

सध्या ममता बॅनर्जी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या एका पायाला प्लॅस्टर करण्यात आल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. त्यामुळे आता बंगालच्या राजकारणात काही मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

अभिषेक बॅनर्जी यांनी ममतांचा रुग्णलयामधील फोटो ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करताना अभिषेक यांनी, “भारतीय जनता पक्षाने तयार रहावे. रविवारी २ मे रोजी त्यांना बंगालच्या लोकांची ताकद दिसणार आहे. तयार राहा,” असं म्हटलं आहे. २ मे रोजी बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल असून मतपेटीमधून बंगालचे लोकं भाजपाविरुद्धचा राग व्यक्त करतील असे संकेत अभिषेक यांनी आपल्या ट्विटमधून दिलेत.

ममता बॅनर्जींवर हल्ला नेमका कसा झाला?
ममता बॅनर्जी नंदीग्राम येथे एका मंदिरात पूजेसाठी गेल्या होत्या. मंदिरातून बाहेर परतल्यानंतर त्या गाडीत बसण्यासाठी जात होत्या. यावेळी त्या गाडीत शिरत नाही तोवर चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर करण्यात आले आहे.

 

News English Summary: The attack on West Bengal Chief Minister Mamata Banerjee at Nandigram is reverberating across the country. The Trinamool Congress will now lodge a complaint with the Election Commission. However, the Election Commission has already taken notice of the attack. According to sources, the Election Commission has sought a report on the incident from West Bengal Chief Secretary Alapan Bandopadhyay.

News English Title: West Bengal Assembly Election 2021 CM Mamata Banerjee admitted in hospital news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x