16 December 2024 2:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

West Bengal Election | टीएमसी'ने जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी

Trinamool Congress, Mamata Banerjee, West Bengal Assembly Election 2021

कोलकत्ता, ०५ मार्च: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच तृणमूल सुप्रिमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 294 पैकी 291 जागांवरील उमदेवारांची नावे घोषित केली आहे. ममता बॅनर्जी यांनी तिकीट वाटप जाहीर करताना त्यांनी स्वत:चा मतदारसंघ बदलला असून त्या नंदिग्राममधून निवडणूक लढणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारण्यासाठीच नंदिग्रामची निवड केल्याचं बोललं जात आहे. नंदीग्राम ममता बॅनर्जींचे जवळचे आणि आता भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदु अधिकारी यांचा बालेकिल्ला आहे.

दरम्यान, आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सर्व 291 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. TMC च्या यादीत 100 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यंदा तृणमूलकडून 50 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली आहे. उमेदवारांची यादी जाहीर केलेला तृणमूल पहिलाच पक्ष आहे.

तृणमूल दार्जिलिंगच्या 3 जागांवर आपले उमेदवार उतरवणार नाही, या जागा सहयोगी पक्षासाठी सोडण्यात आल्या आहेत. नुकतेच पक्षात सामील झालेला माजी क्रिकेटर मनोज तिवारीला पक्षाने हावडाच्या शिवपूरमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय, भवानीपूरमधून शोभन देव चटोपाध्याय निवडणुकीच्या मैदानात असतील. ममता सरकारमध्ये अर्थ मंत्री राहिलेले अमित मित्रा निवडणूक लढवणार नाहीत. पक्षाने यंदा 24 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले आहे.

 

News English Summary: As soon as the dates for the West Bengal Assembly elections were announced, Trinamool supremo and Chief Minister Mamata Banerjee announced the names of candidates for 291 out of 294 seats. While announcing the distribution of tickets, Mamata Banerjee has changed her constituency and will contest from Nandigram. It is being said that Mamata Banerjee chose Nandigram to challenge the BJP. Nandigram is the stronghold of Mamata Banerjee’s close confidante and Shubhendu Adhikari who has now joined the BJP.

News English Title: West Bengal Assembly Election 2021 Trinamool supremo Mamata Banerjee announced the names of candidates for 291 out of 294 seats news updates.

हॅशटॅग्स

#MamtaBanerjee(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x