25 March 2025 9:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trident Share Price | ट्रायडंट शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: TRIDENT GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा शेअरमध्ये घसरण, महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अनुमान जाणून घ्या - NSE: GTLINFRA Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई, शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS
x

अरुणाचल प्रदेशात भाजपकडून दगा | जेडीयूची बैठक | बिहारमध्ये महाराष्ट्र फॉर्म्युला?

JDU party, Arunachal Pradesh, MLAs join BJP, Bihar Alliance

पाटणा, २७ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाने बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जेडीयूचे अरुणाचल प्रदेशातील सहा आमदार फोडले. भारतीय जनता पक्षाने जेडीयूला एवढं मोठं खिंडार पाडलं तरी नितीशकुमार शांत आहेत. आमदार फोडल्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही, असं नितीशकुमार यांनी सांगितलं. तर, जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी भारतीय जनता पक्षाच्या या राजकारणावर टीका केली आहे. भारतीय जनता पक्षाचं हे राजकारण मैत्रीसाठी योग्य नाही, असं सांगतानाच पण त्यामुळे बिहारमध्ये या घटनेचा काही परिणाम होणार नसल्याचंही त्याागी यांनी स्पष्ट केलं आहे.

कालपासून म्हणजे 26 आणि 27 डिसेंबर पर्यंत जेडीयूचं राष्ट्रीय अधिवेशन पटना येथे सुरु आहे. त्यात अरुणाचलच्या विषयावर चर्चा होणार आहे. पण या अधिवेशनाचा मेन फोकस बिहारमध्ये जनाधार वाढण्यावर असणार आहे. जेडीयूला विधानसभा निवडणुकीत 15.34 टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जेडीयूने मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. गतवैभव मिळवून आघाडीच्या राजकारणात मानाचं स्थान निर्माण करण्याचा जेडीयूचा प्रयत्न असल्याचंही वृत्त आहे.

बिहारमध्ये एकत्र सत्तेत असताना अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षानं जेडीयूला धक्का दिला. त्यामुळे आता जेडीयूकडूनही भारतीय जनता पक्षाला त्यांच्याच पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. भारतीय जनता पक्षप्रणित एनडीएमध्ये राहून भारतीय जनता पक्षाला धक्के देण्याची जेडीयूची रणनीती असू शकते. आज जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे. यामध्ये काही राष्ट्रीय मुद्द्यांवर भारतीय जनता पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली जाऊ शकते. केंद्रात, राज्यात सोबत राहून भारतीय जनता पक्षावर वेळोवेळी शरसंधान साधण्याची भूमिका मुख्यमंत्री नितीश कुमार घेऊ शकतात.

दरम्यान, अरुणाचल प्रदेशात भाजपने दिलेला दगा मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जिव्हारी लागल्याचं वृत्त आहे आणि त्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे बिहार मध्ये महाराष्ट्राच्या धर्तीवर मोठे राजकारण शिजल्यास त्याचा मोठा फटका भाजपाला बसू शकतो अशी राजकीय स्थिती स्वतः भाजपनेच निर्माण केली आहे. त्यामुळे आजच्या जेडीयूच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

News English Summary: In Arunachal Pradesh, Chief Minister Nitish Kumar has been accused of betraying the BJP and he has also expressed his displeasure. Therefore, the BJP itself has created a political situation in Bihar where a big politics on the lines of Maharashtra can be a big blow to the BJP. So everyone’s attention is on today’s JDU meeting.

News English Title: JDU party angry after Arunachal Pradesh MLAs join BJP party news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bihar(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या