9 May 2021 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोना आपत्ती | देशात मागील 24 तासातील 4,091 रुग्णांचा मृत्यू मोदी भक्तांनो! तुमच्या देवाचे पाय मातीचे आणि हात रक्ताने माखलेले - लेखिका विनिता मोक्किल सुप्रीम कोर्ट आणि पंतप्रधानांकडून राज्याची स्तुती | पण फडणवीसांना बनवाबनवीची शंका Health First | तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपल्या दैनंदिन गोष्टीत हे बदल करा केंद्र सरकारचा ढिम्म कारभार | अखेर सुप्रीम कोर्टाकडून १२ सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना अमेरिकन संस्थेच्या इशाऱ्यानुसार भारतात ऑगस्टपर्यंत १० लाख मृत्यू झाल्यास त्याला मोदी सरकारचं जबाबदार असेल - द लॅन्सेट संपादकीय Health First | जाणून घ्या अर्धशिशीवर ( मायग्रेन )आहेत काही घरगुती उपचार
x

कोरोना व आर्थिक स्थितीवरून लोकांना विचलित करण्यासाठी चीन-भारत मुद्याला हवा

China India, Prakash Ambedkar, Modi Govt

मुंबई, ३ जून: एकीकडे कोरोना व्हायरस आणि पूर्व- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळची संकटं येत असताना युद्धाचे ढगही दाटतील का अशी शंका यायला लागली आहे. भारत-चीन सीमेवर गेल्या काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. डोकलाम वादानंतर पहिल्यांदाच चीनबरोबरच्या सीमेवर तणाव वाढलेला आहे. दोन्ही बाजूंच्या लष्करांनी सज्जतेचे नारे दिलेले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

भारताने हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवण्यास प्राधान्य दिलेलं असलं तरी चीनबरोबरचे संबंध धोक्यात आहेत. त्यातच चिनी वस्तूंवर बहिष्काराच्या पोस्ट वाढत आहेत. या मुद्यावर सध्या समाज माध्यमं देखील व्यापून जाताना दिसत आहे. आज पर्यंतचा मोदी सरकारचा एकूण प्रवास पाहिल्यास जेव्हा जेव्हा केंद्र सरकार कोणत्याही विषयावरून अडचणीत येतं किंवा येण्याची शक्यता अधिक बळावते तेव्हा पाकिस्तान अथवा चीन सारखे मुद्दे अचानक समोर येतात.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्राने असाच पाकिस्तानचा मुद्दा तापवला आणि लोकांना त्यांच्या मूळ गरजांपासून विचलित करून निवडणुका जिंकल्या होत्या. निकालानंतर लगेच तोच मुद्दा माध्यमांवरून गायब झाल्याचं पाहायला मिळालं. आता सध्या कोरोना स्थितीवरून परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. रुग्णसंख्येत भारत एक एक देशाला मागे टाकत आहे. त्यात भीषण आर्थिक परिस्थिती निर्माण झाल्याने बेरोजगारीचा मुद्धा घराघरातील विषय होण्याची शक्यता आहे. अशा लोकांना पुन्हा चीनच्या मुद्द्या आडुन काही काळ खिळवून ठेवलं जाईल असाच काहीसा प्रवास समाज माध्यमं आणि प्रसार माध्यमांमध्ये सुरु झाले आहेत. त्यात चीन एकाच वेळी हाँगकाँग, तैवान, अमेरिका आणि भारताविरुद्ध दंड थोपटलं अशी अजिबात शक्यता नाही.

नेमका त्याच मुद्द्याला प्रकाश आंबेडकर यांनी हात घातला असून केंद्राच्या हेतूवर संशय व्यक्त केला आहे. तसेच चीन-भारत युद्ध संबंधित अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन देखील सामान्य लोकांना केलं आहे. काय म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी नेमकं ट्विट मध्ये;

 

News English Summary: News that there will be an Indo-China war is being spread in the media. The governments of both the countries are trying to divert the public’s attention regarding Corona. The central government has failed to handle the economic condition of the country. So don’t pay attention to government rumors.

News English Title: To divert citizens from Corona critical situation and poor economy condition Modi government spreading China India statements said Prakash Ambedkar News latest updates.

हॅशटॅग्स

#Prakash Ambedkar(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x