12 December 2024 11:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या
x

नरेंद्र मोदी हे भगवान शंकाराचे अवतार | त्यांनी देशाला कोरोनापासून वाचवलं - भाजपचे मंत्री

Himachal Pradesh Minister, PM Naredra Modi, Lord Shiva avatar, Corona

शिमला, १२ मार्च: काल देशात महाशिवरात्री सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. देशातील अनेक ठिकाणी मंदिरातही गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. हिमाचल प्रदेशातही मोठ्या उत्साहाने महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिमला येथील राम मंदिरामध्ये महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हिमाचल प्रदेशमधील शहरविकास मंत्री असणाऱ्या सुरेश भारद्वाज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शंकर भगवानाचा अवतार असल्याचे धक्कादायक विधान केले. (Himachal Pradesh Urban Development Minister Suresh Bhardwaj has said that Prime Minister Narendra Modi is the Avatar of Lord Shiva)

२०१९ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल आले त्यापूर्वी मोदींनी दोन दिवस केदारनाथ येथील गुहेमध्ये ध्यान केलं होतं. त्यावेळी मोदींना भगवान शंकराचे वरदान मिळालं आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने मोदींनी या साथीच्या संकटाला तोंड दिलं आहे ते पाहता त्यांच्याकडे आता जागतिक स्तरावरील नेता म्हणून पाहिलं जाऊ लागलं असल्याचं देखील सांगितलं.

मोदींनी २०१९ च्या निवडणुकीच्या निकालाआधी दोन दिवस केदारनाथमध्ये घालवले. या काळात ते गुहेमध्ये ध्यान करत होते. त्यानंतर निवडणुकीत मोठा विजय मिळाला याचं आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सर्वांनी स्मरण केलं पाहिजे, असंही भारद्वाज म्हणाले. मोदी हे भगवान शंकाराचे रुप असल्यानेच त्यांनी देशाला करोनासारख्या संकटापासून वाचवलं, असं देखील भारद्वाज यांनी आपल्या भाषणात नमूद केल्याचं आऊटलूक इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

लसीकरण मोहीम सुरु झाल्यानंतर मोदींची प्रतिमा अधिक मोठी झालीय. त्यामुळेच ते शिवाचा अवतार आहेत, असा दावा देखील भारद्वाज यांनी केलाय. इतकचं नाही तर मोदींनी कोरोनापासून देशाला वाचवलं हे सांगताना भारतामध्ये करोना मृत्यूदर कमी असण्यासाचे श्रेयही भारद्वाज यांनी मोदींनाच दिलं आहे. हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय शिवरात्री मोहोत्सव सुरु होत आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांच्या हस्ते या मोहोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

 

News English Summary: Himachal Pradesh Urban Development Minister Suresh Bhardwaj has said that Prime Minister Narendra Modi is the incarnation of Lord Shankar at a function organised on the occasion of Mahashivaratri at the Ram Temple in Shimla.

News English Title: Himachal Pradesh Minister said PM Naredra Modi is avatar of of Lord Shiva news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x