25 September 2023 3:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | गुड-न्यूज! आज तुमच्या शहरातील सोन्याचे भाव जोरदार घसरले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या Stocks to Buy | साउथ इंडियन बँकेचा शेअर 26 रुपयाचा, पण 6 दिवसात 13.50 टक्के परतावा दिला, आता 15 टक्के कमाई करा Tata Power Vs GMR Power Share | कोणता शेअर पॉवर दाखवेल? या शेअरने 1 महिन्यात 74% परतावा दिला, कोणता शेअर आहे स्वस्त? Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे टॉप 5 शेअर्स मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, फायद्याची यादी सेव्ह करा Mangal Ketu Yuti | या आहेत त्या 3 भाग्यवान राशी, मंगळ-केतूच्या युतीने नशीब फळफळणार, अत्यंत फायदेशीर काळ, तुमची राशी आहे? HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर! हिंदुस्तान एरोनॉटिक्स स्टॉक स्प्लिट होणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या उच्च शिक्षित RBI चीफ उर्जित पटेल यांना पैशांच्या ढिगाऱ्यावर बसलेला साप म्हणाले होते पीएम मोदी, माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक दावा
x

मोदींचं अरुण गोयल यांच्या फेक अकाउंटला उत्तर; कोरोनाविरुद्ध लढ्याला शक्ती मिळाली

Prabhu Ram, Ramayan Serial, Arun Goil Fake Account

मुंबई, ०८ एप्रिल: लॉकडाऊनमुळे अरुण गोविल यांची प्रमुख भूमिका असलेली ‘रामायण’ टीव्ही मालिका दूरदर्शनवर प्रसारित केली जातं आहे. त्यामुळे लोकांना टीव्हीवर पुन्हा एकदा भगवान राम पाहायला मिळत आहेत. या मालिकेला आजही मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अरुण गोविल देखील भारावून गेले आहेत. मात्र अरुण गोविल यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे समाज माध्यमांवर त्यांच्या नावाने फेक अकाउंट देखील उघडण्यात आलं आहे. मात्र त्यानंतर जो प्रकार घडला आहे त्यातून हसावं की रडावं असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

काही दिवसांपूर्वीच रामायणाची चर्चा होताच एका फेक युजरने अरूण गोविल यांचे फेक ट्विटर अकाऊंट बनवून टाकले. ‘अखेर मी ट्विटरवर आलोय… जय श्रीराम’ असे ट्विट @TheArunGovil नामक फेक ट्विटर हँडलवरून केले गेले. साक्षात ‘राम’ ट्विटरवर आलेले बघून ट्विटर युजर कमालीचे उत्साहित झाले आणि बघता बघता या अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या वाढू लागली. यानंतर या फेक ट्विटर अकाऊंटवर अरूण गोविल यांचा एक व्हिडीओही अपलोड केला गेला. विशेष म्हणजे, हा व्हिडीओ अपलोड करताना पीएम मोदी यांनाही टॅग केले गेले.

त्यानंतर खुद्द पंतप्रधान मोदीही या अकाऊंटला पाहून फसले. त्यांनी हे ट्विट अरूण गोविल यांचेच समजून त्यांचे आभार मानलेत. ‘तुमचा हा संदेश कोरोनाविरूद्ध सुरु असलेल्या लढाईच्या संकल्पाला आणखी बळ देईल,’असे मोदींनी लिहिले. अरूण गोविल यांना हे समजल्यावर त्यांनी मोदींचे आभार मानलेत. पण सोबत माझे अधिकृत ट्विटर अकाऊंट @ArunGovil12 या नावाने आहे, याचाही खुलासा केला. तेव्हा कुठे फेक युजरने गोविल यांचे फेक अकाऊंट डिलीट केले.

फेक अकाऊंटचा असा पर्दाफाश झाल्यानंतर अरूण गोविल यांनी एक व्हिडीओ जारी करून, स्वत:च्या अधिकृत अकाऊंटबद्दल माहिती दिली. माझ्या नावाने बनावट सोशल अकाऊंट बनवले जात आहेत. कृपया असे करू नका, अशी विनंती त्यांनी या माध्यमातून केली.

हे आहे अरुण गोविल यांचं ओरिजनल ट्विटर अकाउंट

 

News English Summary: Due to the lock down, the ‘Ramayana’ TV series featuring Arun Govil is being broadcast on television. So people are getting to see Lord Ram again on TV. Arun Govil has also been overwhelmed by the response he has received to this series. However, due to the growing popularity of Arun Govil, a fake account has also been opened in his name on social media. But after that, the question of whether to laugh or to weep from the kind that has happened has started to arise.

News English Title: Story Ramanand Sagar Ramayan Prabhu Ram PM Narendra Modi tweeted fake account actor Arun Govil Covid19 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x