12 December 2024 5:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON
x

पासपोर्ट धारकांच्या चुकांची किंमत रेशनकार्ड धारकांना क्रूरपणे चुकवावी लागत आहे? सविस्तर वृत्त

Corona crisis, Covid 19

बरेली, ३० मार्च: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशव्यापी बंदमुळे बेरोजगार आणि बेघर लोक आता आपल्या गावी व खेड्याकडे जाण्यास निघाले आहेत. अशा प्रकरणात वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हजारो स्थलांतरित कामगार आपल्या कुटुंबीयांसह शेकडो किलोमीटर चालत आहेत. त्यांच्याकडे जगण्याची सुविधा नाही किंवा घरी पोहोचण्याचे साधन नाही, या लोकांना भयंकर अडचणी येत आहेत.

या लोकांना निवारा गृहात ठेवून सुविधा उपलब्ध करून देण्याचे राज्य सरकारांना आदेश द्यावेत, असा याचिकेत उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र देशात गरीब श्रीमंत असे दोन गट असल्याचं कोरोनाच्या आपत्तीनंतर दिसतं आहे. देशभरातील रेशनकार्ड धारक कामगारांना आज देशातील पासपोर्ट धारकांनी केलेल्या चुकांची किंमत अत्यंत क्रूरपणे फेडावी लागत आहे असंच म्हणावं लागेल.

अनेक राज्यांमध्ये कामगारांना विचित्रं परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे परत आपल्या मूळ गावी बरैलीमध्ये आलेल्या मजुरांवर कोरोना विषाणू फैलाव प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. या प्रकरणी नक्की काय घडले, याची चौकशी करण्यात येईल, असे बरैलीचे जिल्हाधिकारी नितीश कुमार यांनी म्हटले आहे.

आपल्या गावी परतलेल्या मजुरांना ज्या पद्धतीने प्रशासनाकडून वागणूक देण्यात आली, त्यावरून सोशल मीडियामध्ये टीका सुरू झाली आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लोकांना बस स्टॅंडजवळ एका कोपऱ्यात बसविण्यात आले असल्याचे दिसते. त्यांच्यावर पाण्यातून औषध फवारणी करण्यात आली. काही जणांनी या मजुरांवर रसायन फवारणी करण्यात आल्याचा आरोप केला.

या संदर्भात बरैलीतील अग्निशामक विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, फवारणी करण्यात आलेल्या पाण्यामध्ये केवळ लिक्विड ब्लीच घालण्यात आले होते. प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसारच ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, हा सगळा काय प्रकार घडला आहे याबद्दल जिल्हाधिकारी किंवा आरोग्य अधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही.

 

News English Summary: In many states, workers are faced with strange situations. News on social media that the Corona virus spread has been sprayed on laborers returning to their hometown of Bareilly due to the lock down has gone viral. Bareilly District Collector Nitish Kumar has said that inquiry into what exactly happened in the case will be investigated. A video of the incident has also gone viral. It appears people were seated in a corner near the bus stand. They were sprayed with water. Some accused the laborers of spraying chemicals.

 

News English Title: Story will look into it barelly DM on allegations that migrant workers got chemical bath in Uttar Pradesh News Latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x